Nashik News: शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल, हॉटेलमध्ये बचतगटांना स्टॉल्स; उमेद अभियानाच्या वतीने खरेदी-विक्री संमेलन

Chief Executive Officer Ashima Mittal, Dhananjay Bele, Prafulla Sancheti etc. while inaugurating 'Buy-Sales Meeting 2023' organized in Zilla Parishad.
Chief Executive Officer Ashima Mittal, Dhananjay Bele, Prafulla Sancheti etc. while inaugurating 'Buy-Sales Meeting 2023' organized in Zilla Parishad.esakal

Nashik News : ग्रामीण भागातील महिला बचत समूहाने उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी, यासाठी शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल, हॉटेलमध्ये बचतगटांना स्टॉल्स उपलब्ध करून देण्याची ग्वाही ‘खरेदी-विक्री संमेलन २0२३’ मध्ये उद्योजकांनी दिली. त्यामुळे या उत्पादित वस्तूंना मोठी बाजारपेठ मिळणार आहे.

ग्रामीण भागातील महिला बचत समूहाकडून तब्बल ३०० प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती केली जाते. या उत्पादनांना सुयोग्य बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या उमेद अभियान नाशिकच्या वतीने ‘खरेदी-विक्री संमेलन २0२३’ चे शुक्रवारी (ता. १) जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहात आयोजन करण्यात आले होते. (Buying and selling meeting in Zilla Parishad on behalf of Umed Abhiyan nashik news)

या संमेलनात नाशिक जिल्ह्यातील महिला बचतगट व उद्योजक उपस्थित होते. सुरवातीला उमेद अभियानांतर्गत महिला बचतगटाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली सर्व उत्पादने चांगली असून, गुणवत्ता व दर्जा राखूनच बाजारपेठेत विक्री केले जातात. त्यामुळे महिलांना एक संधी आपल्या माध्यमातून मिळावी, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.

निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी निमा असोसिएशनकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, असे सांगितले. किराणा असोसिएशनकडून महिलांना सहकार्य केले जाईल, तसेच माझ्या मॉलमध्ये ‘उमेद कॉर्नर’ सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देईल, असे आश्वासन प्रफुल संचेती यांनी दिले. हॉटेलमध्ये जेवायला येणारा ग्राहक हा ग्रामीण भागातील हाताने तयार केलेल्या खाद्य पदार्थांना प्राधान्य देतो, यासाठी हॉटेल करीलीव्हेज याठिकाणी जागा उपलब्ध करून देऊ, असे विक्रांत उगले यांनी सांगितले.

Chief Executive Officer Ashima Mittal, Dhananjay Bele, Prafulla Sancheti etc. while inaugurating 'Buy-Sales Meeting 2023' organized in Zilla Parishad.
Nashik Unseasonal Rain Damage: मंत्र्यांसमोरच शेतकऱ्याचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न

तसेच हॉटेल ग्रेप कौन्टीचे किरण चव्हाण यांनीदेखील महिला बचत समूहातील उत्पादनांना जागा उपलब्ध करून देणार असल्याचे जाहीर केले. खाद्य पदार्थांना फूड प्रमाणपत्र नोंदणी करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे त्या पदार्थाचा दर्जा ग्राहकांना लक्षात येतो. त्या उत्पादनाप्रति ग्राहकांचा विश्वास वाढतो, असेही मत अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त उदय लोहकरे यांनी व्यक्त केले. ज्योती केदारे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा व्यवस्थापक अमोल बाविस्कर यांनी आभार मानले.

संमेलनात विविध वस्तूंची मागणी

संमेलनात गहू- ४० टन, मनुके- २ टन, लसूण- १ क्विंटल, गहू- २ टन, तांदूळ- १ टन, कांदा- ४० टन, तूरडाळ प्रोसेसिंग- ४० टन, मका- २ टन, नागली व बाजरी- २ टन, मका पापड, नागली पापड, प्रीमिक्स, शोभेच्या वस्तू, मेठ चंद्राची गोधडी, रागी कुकीज इत्यादी उत्पादनांना ऑर्डर मिळाल्या.

Chief Executive Officer Ashima Mittal, Dhananjay Bele, Prafulla Sancheti etc. while inaugurating 'Buy-Sales Meeting 2023' organized in Zilla Parishad.
Nashik News: उपसरपंचांना मिळाला ‘आदर्श सरपंच’ पुरस्कार; सरपंच परिषद कार्यद्धतीवर लोकप्रतिनिधींकडून आश्चर्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com