नाशिक जिल्ह्यात ग्राम पंचायतींच्या ३९४ जागांसाठी पोटनिवडणूक | Gram Panchayat Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gram Panchayat by elections

नाशिक जिल्ह्यात ग्राम पंचायतींच्या ३९४ जागांसाठी पोटनिवडणूक

नाशिक : राज्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यानुसार जिल्ह्यातील २३० ग्रामपंचायतींमधील ३९४ रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार २१ डिसेंबला मतदान होणार असून, २२ डिसेंबरला मतमोजणी करण्यात येईल. दरम्यान, निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याने या २३० ग्रामपंचायतींमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. तर, राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील ४ हजार ५५४ ग्रामपंचायतींसाठी ही पोट निवडणूक होणार आहे. यात, जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील ३९४ जागांचा समावेश असल्याने येत्या सोमवारी (ता. २२) तहसीलदार अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करतील. याच दिवशी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होईल. त्यानंतर, ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. २१ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल व दुसऱ्या दिवशी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईल.

हेही वाचा: शेतकऱ्याने समस्येत शोधली संधी; एका हंगामात कमावले 50 लाख

जिल्ह्यातील स्थिती

तालुका ग्रामपंचायतींची संख्या रिक्तपदे
नाशिक १६ २४
त्र्यंबकेश्‍वर ०९ १७
पेठ ०१ ०१
नांदगाव ११ १७
बागलाण ४९ ९७
सिन्नर १६ २०
कळवण २२ ३४
मालेगाव १६ २१
देवळा ०८ ११
चांदवड १२ २२
दिंडोरी १७ ३०
इगतपुरी २८ ५९
येवला ०८ १३
निफाड १७ २८

हेही वाचा: नाशिक | पावसाच्या अंदाजाने द्राक्ष उत्पादक धास्तावले

loading image
go to top