NMC News : नाशिक शहरात बेवारस, नादुरुस्त वाहन उचलण्याची मोहीम; जप्तीतून कारवाईचा खर्च करणार वसूल

वाहन मालकांनी सात दिवसात ती वाहने हटवावी अन्यथा जप्तीची कारवाई केली जाणार असून जप्त केलेली वाहने लिलाव करून त्यातून कारवाईचा खर्च वसुल केला जाणार आहे.
Old Abandoned vehicles
Old Abandoned vehiclesesakal

नाशिक : महापालिकेकडून शहरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. त्या मोहिमेचा भाग म्हणून रस्त्यावर विनावापर पडून असलेल्या व अनधिकृतपणे सोडून दिलेल्या बेवारस व नादुरुस्त वाहन उचलण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे.

वाहन मालकांनी सात दिवसात ती वाहने हटवावी अन्यथा जप्तीची कारवाई केली जाणार असून जप्त केलेली वाहने लिलाव करून त्यातून कारवाईचा खर्च वसुल केला जाणार आहे. (Campaign to pick up abandoned broken down vehicles in city Proceeds will be recovered from confiscation Nashik News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील आठवड्यात नाशिकमध्ये आले होते. या वेळी प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरात दर्शन घेतले. त्याचवेळी त्यांनी मंदिराच्या परिसरात स्वच्छता केली. पंतप्रधानांच्या पंचसूत्री मध्ये स्वच्छतेला महत्त्व देण्यात आले आहे.

त्याचबरोबर २२ जानेवारीला अयोध्येत श्री राम मंदिराचे उद्‌घाटन व रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंदिरांसह मंदिराकडे जाणारे रस्ते व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

त्याच आवाहनाच्या अनुषंगाने महापालिकेकडून ३१ जानेवारीपर्यंत विशेष स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. डीप क्लिनिंग असे स्वच्छता मोहिमेला नाव देण्यात आले आहे.

स्वच्छतेच्याच अनुषंगाने महापालिकेने कलम २३०, २३१ व २४३ अनुसार शहरातील बेवारस वाहनांचे मालक, चालक, गॅरेज धारक व वापरकर्त्यांना जाहीर नोटीस बजावली आहे.

त्यात महापालिका हद्दीतील रस्ते, पूल, फुटपाथ, उड्डाणपूल येथे अनधिकृतपणे सोडून दिलेली वाहने हटविण्याची कारवाई महापालिकेच्या वतीने लवकरच हाती घेतली जाणार असून त्या मोहिमेत वाहने जप्त केली जाणार आहे.

सदरची कारवाई यापुढे कायम राहणार असल्याचे नोटिशीमध्ये म्हटले आहे. महापालिका हद्दीतील बेवारस वाहनांचे मालक, चालक, गॅरेज धारक व वापरकर्त्यांनी सात दिवसांच्या आत वाहने उचलावी गॅरेज धारकांनी देखील सार्वजनिक ठिकाणची वाहने स्वतःहून काढून घ्यावी.

त्यानंतर रस्ते, उड्डाणपूल पूल व सार्वजनिक जागांवर सोडून दिलेली व बेवारसपणे पडलेली वाहने जप्त करण्याची कारवाई केली जाणार आहे. जप्त केलेली वाहने जाहीर लिलाव काढून विकली जाणार असून त्यातून गाड्या उचलण्याचा खर्च वसूल केला जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी सांगितले.

Old Abandoned vehicles
NMC News : शहरात 7 वाहनतळ विकसित होणार! महापालिकाच सोडविणार प्रश्‍न

स्वच्छता मोहिमेची ठिकाणे

सार्वजनिक ठिकाणचे रस्ते, दुभाजक, नदीपात्र, नदीकिनारी, बाजारपेठ, व्यावसायिक ठिकाणे सार्वजनिक व सुलभ शौचालय महापालिकेची सर्व उद्याने, मोकळी भूखंड, धार्मिक स्थळ परिसर गोदाघाट व पुलांच्या ठिकाणी स्वच्छता केली जाणार असून, त्यासाठी सहा विभाग अधिकाऱ्यांना समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

त्याचबरोबर विभागीय अधिकाऱ्यांवर नियंत्रणासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचीदेखील नियुक्ती करण्यात आली आहे.

पंचवटी विभागात विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यांच्यासमवेत मुख्य लेखा वित्त अधिकारी, पूर्व विभागात विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांच्यासमवेत उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, नाशिक रोड विभागात विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्यासमवेत उपायुक्त श्रीकांत पवार, पश्चिम विभागात विभागीय अधिकारी योगेश रकटे यांच्या समवेत अतिक्रमण उपायुक्त नितीन नेर, सातपूर व सिडको विभागात विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांच्यासमवेत प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Old Abandoned vehicles
Nashik News : पाथर्डीतील नववसाहतींना नागरी सुविधांची अपेक्षा; कर भरूनही नागरिक वंचित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com