Nashik News: कॅनॉल रोड मुख्य रस्त्याचे काम संथगतीने; दीड वर्षापासून नागरिकांची कसरत

Canal Road main road work slow in process nashik news
Canal Road main road work slow in process nashik news
Updated on

Nashik News: उपनगरपासून तर थेट पाण्याच्या टाकीपर्यंत तीन किलोमीटरच्या रस्त्याचे काम सध्या संथगतीने चालू असून, गेल्या दीड वर्षापासून या रस्त्याने मार्गक्रमण करताना अडचणी येत आहे.

पाइपलाइन टाकण्याच्या नावाखाली दीड वर्षापासून येथील नागरिक कसरत करत असून हा रस्ता म्हणजे सध्या मृत्यूचा सापळा बनत आहे. (Canal Road main road work slow in process nashik news)

उपनगरपासून तर थेट पाण्याच्या टाकीपर्यंत तीन किलोमीटरचा कॅनल रोड झोपडपट्टी लगतचा रस्ता सध्या मोठ्या प्रमाणावर खचला आहे. रस्त्याचे काम करण्याच्या नावाखाली गेल्या दीड वर्षापासून या रस्त्यावर डांबर पडलेले नाही. पर्यायाने नागरिक सध्या खड्ड्यातून आपले वाहन घेऊन मार्गक्रमण करीत आहे.

यासंदर्भात आजपर्यंत एकाही नगरसेवक अथवा लोकप्रतिनिधीने आवाज उठवलेला नसून केवळ ठेकेदाराच्या मर्जीनुसार या रस्त्याचे काम सुरू असल्याचे लोक सांगत आहे. येथे आम्रपाली कॅनॉल रोड झोपडपट्टी असून, गोसावीनगर, मंगलमूर्तीनगर, इच्छामणी शाळा, अप्पू चौक, उपनगर कॅनल रोड, नारायणबापूनगर, जॉन अगस्तीन रोड व इतर आसपासच्या परिसराचा मार्गक्रमण करण्याचा हा मुख्य रस्ता आहे.

Canal Road main road work slow in process nashik news
Students Online Attendance: ‘स्विफ्ट चॅट’चा पहिल्या दिवशी फज्जा! माहिती भरण्यात अनेक अडचणी

मात्र हा रस्ता खचल्यामुळे सध्या अनेक वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. जेल रोड होऊन थेट द्वारकाकडे जायचे असल्यास या मुख्य रस्त्याचा वापर सर्वच लोक करतात.

"उपनगर ते कॅनल रोड पाण्याचे टाकी हा तीन किलोमीटर रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून दुरुस्त करण्याच्या नावाखाली खड्ड्यांनी वेढलेला आहे. काम संथगतीने सुरू असून. अनेक दिवसांपासून वाहनचालकांना मुठीत जीव घेऊन प्रवास करावा लागत आहे. महापालिका व प्रशासनाने यात गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे." - संदीप जगझाप, नागरिक

Canal Road main road work slow in process nashik news
NMC News: महापालिकेसह दुकानदारांना मराठीचे वावडे! दंडात्मक कारवाई कोणी करावी यावरून पेच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com