Students Online Attendance: ‘स्विफ्ट चॅट’चा पहिल्या दिवशी फज्जा! माहिती भरण्यात अनेक अडचणी

Students attendance
Students attendanceesakal

Students Online Attendance: राज्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची दररोज ऑनलाइन नोंद केली जाणार आहे. 'स्विफ्ट चॅट' याद्वारे ही नोंद घेतली जाणार आहे. गुरुवारपासून (ता.१) ऑनलाइन हजेरी नोंदवायला सुरवात झाली.

पहिल्याच दिवशी अनंत अडचणी आल्याने शिक्षकांच्या समुहावर या हजेरीबाबत चर्चा सुरू होती. केंद्र व पंचायत समिती शैक्षणिक समुहामध्ये अधिकारींचे प्रतिनिधी वारंवार ऑनलाईन उपस्थितीचे पत्र व संदेश टाकून उपस्थिती नोंदविण्याचे आवाहन करत होते. (Students Online Attendance Many difficulties in filling information nashik news)

स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची दररोजची हजेरी स्विफ्ट चॅट या ॲपमध्ये नोंदवावी लागणार आहे. यासंदर्भात जुजबी सूचना देण्यात आल्या. या ॲपवर संबंधित शिक्षकांचा शालार्थ आयडी व मोबाईल क्रमांक जुळत नसल्याने अनेकांची उपस्थिती नोंदवण्यात अडचणी आल्या.

स्टुटंड पोर्टलवर शाळेत दररोज शालेय पोषण आहारासाठी उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नोंदवावी लागते. शिक्षकांना केंद्राच्या यूडायसवरही विद्यार्थ्यांची माहिती भरावी लागते. दरम्यान आधीच ऑनलाइन अनेक नोंदणी व उपक्रम यामुळे शिक्षक त्रासलेले असताना हा निर्णय अडचणीचा ठरू पाहत आहे. यामुळे शिक्षक वर्गाने अध्यापना व्यतिरिक्त इतर कामांना विरोध दर्शविला आहे.

Students attendance
Nashik Winter Update: ढगाळ वातावरण, तरी गारठ्यात वाढ; आज तुरळक पावसाची शक्‍यता

''स्विफ्ट चॅट'वर सर्व माहिती नोंदवायला सांगितली जात आहे. या सगळ्याचे फलित काय? यातून काय साध्य होणार हा प्रश्न आहेच." - वैभव तुपे, खासगी शाळा शिक्षक.

''शिक्षण क्षेत्रात अगदीच रोज नवनवीन प्रयोग राबवला जातोय. शिक्षकांवरील विश्वासच उडालाय की काय अशी स्थिती असून गुरुजींना फक्त शिकवू द्या हो. नवनवीन फंडे वापरण्याऐवजी सर्व रिक्त पदे भरून प्रभारी भार कमी करण्याची गरज आहे.'' - जनार्दन देवरे, मुख्याध्यापक दरेगाव ता.चांदवड.

''शाळांमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांची दैनंदिन हजेरी रोज नोंद होते. शालेय माध्यान्ह भोजन योजनेची उपस्थितीचीही ऑनलाइन नोंद होत असताना ही वेगळ्या ॲपवर उपस्थित घेणे कितपत योग्य आहे. याची पारदर्शकता तरी किती? अध्यापनाचा वेळ यात जाणार आहे.'' - मनिषा सावळे, शिक्षिका, महालक्ष्मी नगर ता.मालेगाव

Students attendance
Nashik Water Cut: नाशिककरांना पाणीकपातीतून दिलासा; जलसंपदा विभाग आरक्षण वाढविणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com