घोरवड घाटात कार कोसळली; एकाचा मृत्यू, 2 जखमी

घोरवड घाटात कार कोसळली; एकाचा मृत्यू, 2 जखमी

सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर-घोटी राष्ट्रीय महामार्गवरील (National Highway) घोरवड घाटात शुक्रवारी (ता. १०) मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुमारे दीडशे ते दोनशे फूट खोल दरीत कार कोसळली (Car Crashed). या दुर्घटनेत कारमधील प्रवासी जागेवरच ठार (Death) झाला असून, दोघे गंभीर जखमी (Injured) झाले. (Car crashes in Ghorwad ghat 1 killed 2 injured Nashik Accident News)

सिन्नरहून घोटीकडे जाणारी टाटा टियागो कार (एमएच १५-जीएल २७४५) घोरवड घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने दरीत कोसळली. अंकुश संतू जमदाडे (वय ३८, रा. वैतरणा, ता. इगतपुरी), अनिल गोपाळ भोर (रा. रायांबे, ता. इगतपुरी) व नामदेव किसन धांडे (रा. भगूर, ता. शेवगाव. जि. अहमदनगर) हे तिघे कारमधून प्रवास करत होते. अपघातानंतर जखमी अवस्थेत अनिल भोर व नामदेव धांडे रात्रीच्या अंधारात दरी चढून महामार्गावर आले. रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना थांबवून त्यांनी अपघाताची माहिती देत मदतीची विनंती केली.

घोरवड घाटात कार कोसळली; एकाचा मृत्यू, 2 जखमी
HSC Result : एकाच कुटुंबातील सासरे, सून, दीर बारावीत उत्तीर्ण

हा प्रकार सिन्नर पोलिसांना कळवल्यावर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी, सुदाम धुमाळ, पोलीस नाईक विनायक आहेर, नवनाथ शिरोळे, रवींद्र चिने यांनी अपघातस्थळी येत जखमींना तातडीने उपचारासाठी हलवले. जखमींकडून मिळालेल्या माहितीनुसार आणखी एक जण कारमध्ये अडकून पडल्याचे समजल्यावर रुग्णवाहिकाचालक पुरुषोत्तम भाटजिरे व शुभम कातकाडे यांनी खोल दरीत उतरून कारमध्ये अडकलेल्या अंकुश जमदाडे यांचा मृतदेह वर आणला. सिन्नर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी जमदाडे यांना मृत घोषित केले. याप्रकरणी सिन्नर पोलिसांत अपघाताची नोंद झाली.

घोरवड घाटात कार कोसळली; एकाचा मृत्यू, 2 जखमी
Nashik : पहिल्याच पावसात 93 घरांची पडझड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com