रस्त्यावर वाढदिवस करणे भोवले; सटाण्यात ५ युवकांविरोधात गुन्हा

Satana Crime News
Satana Crime NewsGoogle
Updated on

सटाणा (जि. नाशिक) : गर्दी करून सार्वजनिक ठिकाणी थेट रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे सटाणा शहरातील युवकांना चांगलेच भोवले आहे. बुधवारी (ता. १५) संचारबंदी काळात शहरातील ताहाराबाद रस्त्यावर वाढदिवसानिमित्त काही युवकांनी आतषबाजीसह केक कापत वाढदिवस साजरा करून शांततेचा भंग केला. या प्रकरणी ‘बर्थडे बॉय’सह पाच युवकांवर सटाणा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरारी झालेल्या सात ते आठ युवकांचा पोलिस कसून शोध घेत आहेत.


शहरातून जाणाऱ्या ताहाराबाद रस्त्यावरील एका दुकानासमोर बुधवारी रात्री दहाला काही युवक थेट रस्त्यावर एकत्र येऊन आतषबाजीसह वाढदिवस साजरा करीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांना मिळाली. कर्मचाऱ्यांना सोबत घेत त्यांनी घटनास्थळ गाठले. या वेळी वाढदिवसाला हजर असलेल्या एकाही युवकाच्या तोंडास मास्क नव्हता. ते सर्व मोठमोठ्याने आरडाओरडा करून शांततेचा भंग करत असल्याचे गायकवाड यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी ‘बर्थडे बॉय’सह पाच युवकांना अटक केली. अंधाराचा फायदा घेत इतर सात ते आठ युवक घटनास्थळावरून फरारी झाले. काही दिवसांपासून सटाणा शहरातील विविध भागात मध्यरात्री आतषबाजी करणे, आरडाओरडा करून थेट रस्त्यावरच केक कापण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. याचा सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास होतो. (case registered against five youths who were celebrating birthday on the street in Satana)

Satana Crime News
नाशिक ऑक्सिजन दुर्घटना पावसाळी अधिवेशनात गाजणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Education expert Bhausaheb Chaskar urged immediate restructuring of the Teacher Eligibility Test to improve the quality of school education.
Tukaram Mundhe milk adulteration complaint
Who is Prashant Wadile?
MP Supriya Sule
Marathi News Esakal
www.esakal.com