esakal | भुजबळांच्या नावाने सुनील झंवरच्या मुलास फोन; फसवणूकीचा गुन्हा दाखल | Nashik
sakal

बोलून बातमी शोधा

case registered for cheating sunil zanwar son by using bhujbal name on phone

भुजबळांच्या नावाने सुनील झंवरच्या मुलास फोन; फसवणूकीचा गुन्हा दाखल

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (जि. नाशिक) : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील अपहाराच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले सुनील झंवर (Sunil zanwar) यांच्या मुलास नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ व त्यांचे पूत्र पंकज भुजबळ यांच्या नावाने फोन करत ‘तुम्ही माझे एक काम करुन द्या, मी तुमचे काम करुन देतो’ असे सांगत फसवणूक केली. या प्रकरणात चक्क जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांचेही नाव वापरले गेले. अखेर या प्रकरणाची चौकशी करुन अंबड पोलिसांत महाराष्ट्र शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बीएचआर पतसंस्थेच्या प्रकरणात सुनील झंवर यांच्यावर पुण्याच्या डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात झंवर यांना ७ सप्टेंबरला अटक करण्यात आली आहे. त्यांचा मुलगा सुरज झंवर उच्च न्यायालयात कामानिमित्त आले असता, त्यांना ९४२३४२११११ या क्रमांकावरुन फोन आला. मी पंकज भुजबळ बोलत असून, तुम्ही ८ सप्टेंबरला मला जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन भेटा, असे सांगत फोन बंद केला गेला. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरुन फोन करुन पंकज भुजबळांचा पीए बोलत असल्याचे सांगत, अजून तुम्ही जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले नाही. कलेक्टर साहेबांचा पीए वाट पाहत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर काही वेळात जळगाव येथील एका लँण्ड लाइन क्रमांकावरुन फोन करत ‘मी अभिजित राऊत (जळगाव जिल्हाधिकारी) बोलतोय… तुमचे काही काम आहे का? अशी विचारणा केली गेली. मात्र, सुरज झंवर यांनी नाही म्हटल्यावर समोरच्या व्यक्तीने फोन ठेवला. त्यानंतर, झंवर यांनी जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेतली. त्यांनाही या प्रकारासंदर्भात काहीच माहिती नव्हती. त्याचवेळी जळगाव जिल्हाधिकारी यांच्या लँण्डलाईनवर नाशिकहून पंकज भुजबळ यांचा फोन आल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांच्या पीएने सांगितले. त्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा मोबाइलद्वारे पंकज भुजबळ बोलत असल्याचा फोन आला व लँण्ड लाइनवरुन फोन करण्यास सांगण्यात आले.

हेही वाचा: मुक्त विद्यापीठात प्रवेशासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ


कोणाला सांगू नका…

सुरज झंवर यांनी जळगाव येथील मित्राच्या लँण्ड लाइनवरुन फोन लावला असता, स्वतः छगन भुजबळ असल्याची बतावणी करत, माझा फोन आल्याचे कोणाला सांगणार नाही, असे वचन देण्याचे सांगून तुम्ही माझे एक काम करुन द्या, मी तुमचे एक काम करुन देतो, अशी ऑफर दिली गेली. तुम्हाला समीर व पंकज भुजबळही मदत करतील आणि संपर्कात राहतील, असे सांगत फोन बंद केला गेला.

हेही वाचा: महिंद्रा Xuv700 ची बुकिंग 'या' तारखेला होणार सुरू, पाहा डिटेल्स


चौकशी करुन गुन्हा दाखल

मोबाईलवर आलेले ऑडिओ क्लिप नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, समीर भुजबळ यांना ऐकवण्यात आल्या. त्यावरून ‘तो’ आवाज त्यांचा नसल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी नाशिक पोलिसांत १८ सप्टेंबरला तक्रार अर्ज दाखल केला. त्यानंतर पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांनी या प्रकरणाची चौकशी करत पालकमंत्री भुजबळ, जळगावचे जिल्हाधिकारी राऊत, पंकज भुजबळ यांच्या नावाचा वापर करत फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

loading image
go to top