esakal | नाशिक, इगतपुरीत ‘CBI’चे छापे; अनिल देशमुखांच्या अडचणीत होणार वाढ?
sakal

बोलून बातमी शोधा

anil deshmukh and parambir singh

नाशिक, इगतपुरीत ‘CBI’चे छापे; अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ?

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) शहरासह जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात छापे टाकल्याची चर्चा होती. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी हे छापे बुधवारी (ता. २८) टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे. (CBI-raids-in-Nashik-Igatpuri-Related-Anil Deshmukh-parambir-singh-case-jpd93)

नाशिक, इगतपुरीत ‘CBI’चे छापे

राज्यातील तब्बल १२ शहरांमध्ये सीबीआयने बुधवारी छापे टाकले. त्यात मुंबई, पुणे, नाशिक, नगर, सांगली या शहरांचा समावेश आहे. या छाप्यांसंदर्भात अधिक माहिती समोर आली नसली, तरी माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याशी संबंधित प्रकरणाच्या तपासाचा हा एक भाग आहे. एका पोलिस उपायुक्तांच्या नगर आणि मुंबई येथील निवासस्थानी, तसेच सहआयुक्तांच्या पुणे आणि सांगली येथील निवासस्थानी सीबीआयने छापे टाकल्याची चर्चा होती. नाशिक शहरातील एका नातेवाइकाकडे आणि इगतपुरी तालुक्यातील दोन रिसॉर्टवर सीबीआयने छापे टाकल्याची चर्चा आहे. या छाप्यांतून जी माहिती समोर येईल त्याआधारे देशमुख यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा: नाशिक नोटप्रेस चोरी प्रकरण : आणखी 7 जण निलंबित

हेही वाचा: नाशिकमध्ये कपात अन्‌ मराठवाड्याला मात्र पाणी!

loading image
go to top