esakal | नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : उच्चस्तरीय चौकशी समितीत कोण कोण असणार?

बोलून बातमी शोधा

rajesh tope

नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : उच्चस्तरीय चौकशी समितीत कोण कोण असणार?

sakal_logo
By
टींम ई सकाळ

नाशिक : बुधवारी (ता.२१) महापालिका, शासन स्तरावर यंत्रणा असतानाही डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात दुर्देवी घटना घडली, प्रशासकीय व्यवस्थेच्या त्रुटींमुळेच दुर्घटना घडून त्यात नाहक गोरगरीब २२ जणांचा बळी गेल्याचे स्पष्ट झाले. दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी 7 सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आलीय. समिती आधी या दुर्घटनेची सखोल चौकशी करेल आणि त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली असून पण या उच्चस्तरीय चौकशी समितीत नेमके कोण कोण असणार आहे. जाणून घेऊ सविस्तर..

चौकशी समितीत कोण कोण असणार ?

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, नाशिकची दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेच्या चौकशीसाठी 7 सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमल्याचे सांगितले. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती चौकशी करेल. या समितीमध्ये वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य, महापालिकेचे अभियंता आणि ऑक्सिजन प्लांट उभारणीचं काम करणाऱ्या लोकांचा समावेश असेल, अशी माहिती राजेश टोपेंनी दिली.

हेही वाचा: Breaking : धक्कादायक! नाशिक शहरातील 5 हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा

पुनरावृत्ती न होण्यासाठी (SOP)ठरविणार

आधी 7 सदस्यीय उच्चस्तरीय समिती घटनेची चौकशी करेल. यानंतर या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून (SOP)एसओपी ठरवली जाईल. चौकशी समितीकडून मिळालेल्या सूचना SOP म्हणून लागू करु, या चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. असं राजेश टोपे म्हणाले.

हेही वाचा: कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण! चांदवडच्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..