रमजान ईदनिमित्त घरातच करा नमाजपठण; पोलिसांचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Celebrate Eid-e-Milad at home

रमजान ईदनिमित्त घरातच करा नमाजपठण; पोलिसांचे आवाहन

मालेगाव (जि. नाशिक) : मुस्लिम बांधवांनी रमजानपर्वात(Ramzan/Ramdan) रोजे ठेवून शांततेसाठी इबादत केली. रमजानपर्व शांततेत साजरे होत आहे. कोरोना संसर्ग(Corona virus) रोखण्यासाठी गर्दी(Crowd) करण्यास, सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात कडक लॉकडाउन(Lockdown) जाहीर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर ईदगाह मैदानांवर रमजान ईदचे सामूहिक नमाजपठण करण्यास बंदी आहे. शहरवासीयांनी शासननिर्देशाचे पालन करून घरातच इबादत व नमाजपठण करावे, असे आवाहन अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी केले.(Celebrate Eid-e-Milad at home)

रुग्णसंख्या कमी असली तरी त्यात सातत्य

ईदसाठी ईदगाह मैदानावर नमाजपठणास परवानगी द्यावी, अशी मागणी मुस्लिम धर्मगुरूंनी केली होती. त्याअनुषंगाने खांडवी यांनी निवडक धर्मगुरू व सामाजिक कार्यकर्त्यांशी नियंत्रण कक्ष आवारातील सुसंवाद हॉलमध्ये चर्चा करताना हे आवाहन केले. शहरातील घटती रुग्णसंख्या, कोविड नियमांचे(covid protocol) पालन आदी मुद्द्यांचे पालन करीत नमाजपठणास परवानगी द्यावी, असे साकडे काही धर्मगुरूंनी घातले. खांडवी म्हणाले, की शासनाने नव्याने कुठलेही आदेश वा सूचना दिलेल्या नाहीत. रुग्णसंख्या कमी असली तरी त्यात सातत्य आहे. उद्रेक कमी झालेला नाही. यामुळे लॉकडाउन झाला आहे. सामाजिक जबाबदारी ओळखून सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी. जनतेने गेल्या वर्षीप्रमाणे घरातच नमाजपठण करून ईद साजरी करावी. पोलिस उपअधीक्षक लता दोंदे, कॅम्पचे उपअधीक्षक प्रवीण जाधव, मौलाना अब्दुल हमीद अझहरी, हाजी युसूफ इलियास, अतहर हुसैन अश्रफी, फिरोज आझमी, डॉ. रईस रिझवी यांच्यासह ईदगाह ट्रस्टी व धर्मगुरू उपस्थित होते.

हेही वाचा: निफाडच्या बहिणीला मालेगावच्या भावाचा आधार! संकटकाळात जपली माणुसकी

''रमजान ईद व लॉकडाउनमुळे पोलिस प्रशासन सज्ज आहे. शहरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. कॅम्प रस्त्यावरील ईदगाह मैदानासह सामूहिक नमाजपठण होणाऱ्या मैदानांवर पोलिस बंदोबस्त तैनात असेल. मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेडिंग करण्यात येईल. बंदोबस्तासाठी १०० पोलिस अधिकारी, ८०० पोलिस कर्मचारी, राज्य राखीव पोलिसांच्या दोन कंपन्या व गृहरक्षक दलाचे २५० जवान बंदोबस्तासाठी असतील. सातत्याने गस्त सुरू असेल. समाजकंटक व गुन्हेगारांवर पोलिस बारकाईने लक्ष ठेवून आहेत.''

-चंद्रकांत खांडवी, अपर पोलिस अधीक्षक, मालेगाव

हेही वाचा: लसीकरण ऑनलाइन नोंदणीत घोळ

Web Title: Celebrate Eid E Milad At Home Nashik Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top