Latest Marathi News | सातपूर, अंबडला छटपूजा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chat- Pooja

Nashik : सातपूर, अंबडला छटपूजा उत्साहात

सातपूर : औद्योगिकनगरीतील उत्तर भारतीय नागरिकांनी गोदावरी व नंदिनी नदीवर रविवारी (ता. ३०) छटपूजेस उत्साहात सुरवात केली. सातपूर व अंबड औद्योगिक नगरीत मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय नागरिक पोटाची खळगी भरण्यासाठी आले असून, त्यातील अनेक कुटुंब स्थानिक झाले आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या आंदोलनानंतर अनेक वर्षे सातपूर व अंबड औद्योगिक कामगारनगरीत छटपूजा व रंगपंचमीचा उत्सव काहीसा फिका पडल्याचेही चित्र पाहायला मिळाले होते. पण, पाच वर्षांत कोरोना व इतर राजकीय समीकरणाचा विचार केला जात आहे. यामुळे कधी काळी छटपूजा उत्सवाला विरोध करणारे राजकीय नेते आता छटपूजा उत्साहात साजरा करण्यासाठी विविध प्रयत्न करताना यंदा पाहायला मिळाले.(Celebrating Chhat Puja in satpur and ambad happily Nashik News)

हेही वाचा: Nashik : प्रवाशांनी गजबजली बसस्‍थानके

तीन दिवसांच्या या छटपूजा उत्सव या वर्षी मोठ्या प्रमाणावर साजरा होत असून, रविवारी मावळत्या सूर्याचे दर्शन घेण्यासाठी शेकडो संख्येने उत्तर भारतीय नागरिकांची गोदावरी काठावरील सोमेश्वर मंदिर व सातपूरच्या नंदिनी नदीवर गर्दी झाली होती.

ऊस, सीताफळ, सफरचंद, पेरू, चिकू, नारळसह विविध प्रकारचे फळाचे नवैद्य देऊन महिलांनी मनोभावे पूजा केली. अनेक महिलांनी आपल्या भोजपुरी भाषातील लोकगाणी म्हणून वातावरणात रंगत आणल्याचे चित्र पाहायला मिळाले.

"१९९५ पासून मी गोरखपूर येथून नाशिकला आलो. आणि त्या काळापासून आमचे कुटुंब छटपूजा करतो. कोरोनानंतर या वर्षी पहिल्यांदा मोठ्या उत्साहात सण साजरा करताना आनंद होत आहे."

-परमानसिंग रावत, परप्रांतीय नागरिक

हेही वाचा: Accident Case : ‘त्याच’ चौफुलीवर पुन्हा अपघात!; CItylinc बसला ॲपे रिक्षा मागून धडकली

टॅग्स :AmbadNashikculture