Accident Case : ‘त्याच’ चौफुलीवर पुन्हा अपघात!; CItylinc बसला ॲपे रिक्षा मागून धडकली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Road widening and repair work in progress near Hotel Mirchi.

Accident Case : ‘त्याच’ चौफुलीवर पुन्हा अपघात!; CItylinc बसला ॲपे रिक्षा मागून धडकली

नाशिक : नाशिक-औरंगाबाद रोडवरील मिर्ची हॉटेल चौफुलीवर रविवारी (ता. ३०) सकाळी पुन्हा अपघात झाला. सिटीलिंक बसला पाठीमागून आलेल्या मालवाहू ॲपेरिक्षाने धडक दिली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र याप्रकरणी आडगाव पोलिसांत कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. दरम्यान, गेल्या महिन्यात याच चौफुलीवर पहाटेच्या सुमारास ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल्समध्ये झालेल्या भीषण अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. (accident at mirchi hotel chowk citylinc bus hit from behind by ape rickshaw nashik News)

हेही वाचा: Nashik : दिवाळीच्या गोड- धोड फराळानंतर खवय्यांचा ‘मटण, चिकन’वर ताव!

नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर प्रवाशांसाठी असलेल्या बसथांब्यावर सिटीलिंक बस (एमएच १५, जीवाय ७७२५) थांबली असता, पाठीमागून आलेली मालवाहू तीनचाकी ॲपरिक्षा (एमएच १५, सीके १५२३) धडकली. यात ॲपेरिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर चालकाला किरकोळ दुखापत झाली. आसपासच्या नागरिकांनी धाव घेत अपघातग्रस्त वाहनाला खेचून रस्त्याच्या कडेला नेले. बसचे फारसे नुकसान झाले नाही. त्यानंतर सिटीलिंक बस मार्गस्थ झाली. घटनास्थळी ॲपेरिक्षाच्या काचा फुटल्याने खच पडला होता. हा अपघात रविवारी (ता. ३०) सकाळी साडेसातच्या सुमारास घडल्याचे समजते. मात्र, याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

याच घटनास्थळी गेल्या महिन्यात ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल बसमध्ये झालेल्या अपघातात १३ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर चौफुलीवर अपघात रोखण्यासाठीच्या तातडीच्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. असे असतानाही रविवारी (ता. ३०) सकाळी अपघात घडला.

हेही वाचा: Nashik : एकत्रित दिवाळीची परंपरा कायम; मुळाण्यातील पाटील कुटुंबात 151 सदस्यांचा समावेश