टॉवरमध्ये राहायला पक्षी काय माणसे आहेत का...?

pakshi tower
pakshi toweresakal

पंचवटी (नाशिक) : निमाणी बसस्थानकाजवळील परशुराम पुरिया पार्कमध्ये महापालिकेने लाखो रुपये उधळून पक्षी घर (Bird house) उभे केले. ते वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. सिमेंट काँक्रिटचा टॉवर बांधून हा तर पैशांचा चुराडा करण्याचा प्रकार आहे. इतक्या वर्दळीच्या ठिकाणी पक्षी अधिवासाचा कुठलाही अभ्यास न करता टॉवर बांधून राहायला पक्षी माणसे आहेत का, असा सवाल पक्षी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

अजब संकल्पनेची गजब तऱ्हा

वाहतूक बेट चौकात पक्षी घर ही अजब डोके लढवून तयार केलेली संकल्पना असून, सिमेंट टॉवरमध्ये रंगीत खोबण्यात पक्षी येतील आणि त्यामुळे पक्षांची वर्दळ वाढेल हा महापालिकेचा बिनबुडाचा उद्देश होता. मात्र, पक्षी माणसांप्रमाणे एकाच सिमेंट टॉवरमध्ये घर करून राहत नाही. प्रत्येक पक्ष्यांची अधिवास, घरटे करण्याची रचना वेगवेगळी आणि निसर्गपूरक असते. पोपट, धनेश, साळुंकी हे आणि इतर कुठलेही पक्षी अशा टॉवरमधील खोबणीत घरटे करून राहत नाही. चिमण्याही वळचणीच्या जागी घरटी बांधून विणीच्या हंगामात घरटी करतात, असा दावा पक्षी तज्ज्ञांनी केला आहे.
पक्षी तज्ज्ञ मानद वन्यजीव संरक्षक डॉ. दिलीप यार्दी यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात कृत्रिम चिमण्यांची घरटी करून ‘परमा कल्चर’ चा प्रयोग राबवला होता. त्यासाठी त्यांनी विशेष अभ्यास करून ठराविक उंचीवर पक्ष्यांची घरटी उंच बांबूवजा लाकडी खांबावर उभी करून सुरेख पथदर्शी प्रकल्प राबवला होता. मात्र, महापालिकेने पंचवटीत उभे केलेले रंगीत पक्षी घराचा फार्स असल्याची प्रतिक्रिया पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केल्या.

pakshi tower
कामातून ब्रेक घेतल्यानंतर असा करा वेळेचा सदुपयोग

कबुत्तरखानाही नव्हे...

पक्षी घर उभारताना कोणत्या पक्षी तज्ज्ञांचे, पर्यावरण तज्ज्ञांशी संबंधित बोलले होते का, करायचे म्हणून उंच टॉवर उभारला आणि दिले पक्षीघर नाव, हा तर पोरखेळ झाला. या सिमेंट टॉवरमधील पक्षांना प्रवेश करण्यासाठी तयार केलेले छिद्र कोणत्या व्यासाचे आहेत. त्याचा अभ्यास का नाही करण्यात आला. यात चिमण्या तर येणारच नाही, असा दावा पक्षी तज्ज्ञांनी केला आहे.

''पक्षी हे माणसासारखे कॉलनी किंवा एका टॉवरमध्ये कधी नाही. परंतु एका कबुतराचे घर ८ ते १० फुटाचे अंतरावर घरटे बांधते. या टॉवर उभारणीचा खर्च टाळून कृत्रिम घरटी वाटायला हवी होती. त्यामुळे पक्षांची किलबिल शहरात वाढली असती." - शेखर गायकवाड, पक्षी अभ्यासक, संस्थापक अध्यक्ष, आपलं पर्यावरण

pakshi tower
हे आहेत जगातील सर्वांत सुंदर रेल्वे स्थानक; आकर्षणाचा केंद्रबिंदू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com