Aircraft Flight Center : मानवरहित विमान उड्डाणाचेही केंद्र | Center for unmanned aircraft flight in city nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Unmanned Aircraft

Aircraft Flight Center : मानवरहित विमान उड्डाणाचेही केंद्र

Aircraft Flight Center : तब्बल १९८६ म्हणजे साधारण ३६ वर्षांपासून विविध साधनसामग्री एकत्रित करीत लष्करी ताकद वाढविण्यासाठी कार्यरत असलेल्या आर्मी एव्हिएशन क्रॉप्सच्या गांधीनगर येथील कॉम्बट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग सेंटर (कॅट) केंद्राने मानव रहित विमान उड्डाणात एक पाऊल पुढे टाकले आहे, मानव विरहित ड्रोन हल्ल्याचे प्रशिक्षित तोपची घडविण्याचा एक टप्पा कॅटने पार केला. (Center for unmanned aircraft flight in city nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आर्मी एव्हिएशन कॉर्प्सचे महासंचालक, कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल अजयकुमार सुरी यांच्या हस्ते आज शुक्रवारी कॉम्बॅट आर्मी एव्हीएशनच्या (कॅट) गांधीनगर येथील प्रशिक्षण केंद्राच्या तळावर झालेल्या कंम्बाईन्ड पासिंग आउट परेडमध्ये मानव विरहित उड्डाणात प्रावीण्य मिळविणाऱ्या ८ अधिकाऱ्यांना गौरविण्यात आले.

विविध प्रशिक्षणाच्या ३७ लष्करी अधिकाऱ्यांना विंग प्रदान करताना रिमोटली पायलेटेड एअर क्राफ्ट सिस्टीम (आरपीएएस) प्रशिक्षणात मेजर पल्लव वैशंपायन यांना ‘ग्राउंड विषयातील सर्वोत्कृष्ट’ आणि लेफ्टनंट कमांडर अनिल कुमार यादव या दोन अधिकाऱ्यांना उड्डाण प्रशिक्षक (बाह्य-अंतर्गत पायलट निरीक्षक) म्हणून ‘फर्स्ट इन ऑर्डर ऑफ मेरिट इन क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर’ ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

टॅग्स :NashikAircraft