Admission
Admissionesakal

11th Admission : अकरावी प्रवेशासाठी साडेतेराशे विद्यार्थ्यांची नोंदणी

Published on

11th Admission : महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्‍या प्रवेशासाठी अर्ज भरण्याच्‍या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. दोन दिवसांत एक हजार ३५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

सद्यःस्थितीत अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा उपलब्‍ध केली आहे. विद्यार्थ्यांसह पालकांना दहावीच्‍या निकालाची प्रतीक्षा लागून आहे. (Thirteen hundred and fifty students registered for 11th Admission nashik news)

दरम्‍यान, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता अकरावीच्‍या प्रवेशासाठी राज्‍यातील प्रमुख शहरांमध्ये केंद्रीभूत ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाते आहे. त्‍यानुसार महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांकरिता केंद्रीभूत ऑनलाइन प्रक्रिया राबविली जाते आहे.

प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अर्जाचे दोन भाग भरायचे असतात. गुरुवार (ता.२५) पासून अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना त्‍यांची वैयक्‍तिक माहिती दाखल करून, या माहितीची पडताळणी करून घ्यायची आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Admission
Success: E Cycle उत्‍पादनात मराठमोळ्या गोकूळची भरारी! वयाच्‍या 19व्या वर्षी यशस्‍वी साधला उद्योजकतेचा प्रवास

त्‍यानुसार दोन दिवसांत एक हजार ३५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी ६५९ विद्यार्थ्यांनी त्‍यांचे अर्ज लॉक केले आहे. तर दोनशे विद्यार्थ्यांचे अर्ज ऑटो-वेरिफाईड झाले आहेत.

दहावीचा निकाल जाहीर झाल्‍यानंतर अर्जाचा भाग दोन भरण्याच्‍या प्रक्रियेला सुरवात होईल. यामध्ये विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शाखांचा पसंतीक्रम नोंदविण्याची संधी दिली जाणार आहे.

Admission
MPSC Success Story : ‘एमपीएससी’ परीक्षेत पातोंड्याच्या तरुणांची बाजी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com