Dr Bharti Pawar : "आरोग्य सेवेसाठी 2270 कोटी" डॉ. भारती पवार यांची माहिती | Central government approves 2270 crore supplementary fund for health care nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Health MP Dr. Bharti Pawar

Dr Bharti Pawar : "आरोग्य सेवेसाठी 2270 कोटी" डॉ. भारती पवार यांची माहिती

Nashik News : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय आरोग्य अभियान मिशनच्या अंमलबजावणींतर्गत महाराष्ट्र राज्यासाठी पुरवणी निधी मंजूर करण्यात आला आहे.

आगामी २०२२ ते २०२४ आर्थिक वर्षासाठी २२७० कोटींच्या पुरवणी निधीला केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. (Central government approves 2270 crore supplementary fund for health care nashik news)

केंद्र शासनाच्या निधीमुळे महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्यसेवा, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका कर्मचारी यांच्या संख्येत होणार वाढ आहे.

त्यात २०२२-२३ आर्थिक वर्षासाठी ६५२.१३ कोटी तर २०२३-२४ आर्थिक वर्षासाठी १६१८.५४ कोटी याप्रमाणे आगामी दोन वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीया यांच्या सहकार्यामुळे २२७० कोटी रुपये राज्याच्या आरोग्य विभागावर खर्च होणार आहेत, असेही डॉ. पवार यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आरोग्य सेवा प्रणाली बळकट करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त पदांना मंजुरी दिली आहे.

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत शहरी लोकसंख्येच्या आरोग्यसेवेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शहरातील आर्थिक दुर्बल घटकांवर लक्ष केंद्रित करून त्यांना अत्यावश्यक प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आणि उपचारासाठी सर्वसामान्यांना परवडणारी आरोग्यसेवा यासाठी अनेक नवीन पदांची शिफारस देखील केली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांसह मानवी आरोग्यसेवा व्यावसायिकांचे वेतन सुनिश्चित करण्याची प्राथमिक जबाबदारी आहे.