Dr. Bharti Pawar | कांदा क्षेत्राचा गावनिहाय अहवाल करावा : डॉ. पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Onion area should be reported village wise suggestion by Dr bharti Pawar

Dr. Bharti Pawar | कांदा क्षेत्राचा गावनिहाय अहवाल करावा : डॉ. पवार

नाशिक : नाफेडमार्फत कांदा (Onion) खरेदीचा दर टप्प्याटप्प्याने वाढत आहे. उन्हाळ कांदा खरेदीसाठीदेखील नियोजन करणे आवश्यक आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना येणारा उत्पादन खर्च व त्यानुसार होणारा नफा याअनुषंगाने कांद्याला भावासाठी प्रयत्न सुरु आहेत. (Onion area should be reported village wise suggestion by Dr bharti Pawar on onion production nashik news)

सोबतच जिल्ह्यातील कांद्याचे क्षेत्र व उत्पादनाच्या अंदाजासाठी कृषी विभागाकडून कांद्याच्या क्षेत्राची माहिती घेण्यासाठी गावनिहाय अचूक अहवाल तयार करावा. अशा सूचना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी (ता. ९) कांदा दराबाबत झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी गंगाथरन डी., सहकार संस्थांचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सतीश खरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, दिल्ली नाफेडचे उपव्यवस्थापक निखिल पाडदे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे आदींसह विविध विभागांचे अधिकारी आणि शेतकरी संघटनाचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

डॉ. पवार म्हणाल्या की, कृषी विभाग व मार्केट कमिटीने तयार केलेल्या अहवालात कांदा उत्पादनाबाबत तफावत नसावी. जिल्ह्यात कांदा उत्पादन क्षमता चांगली असल्याने निर्यात खुली आहे. कांदा निर्यात करताना पोर्टवरील प्लगइन पॉईंट वाढविणे, कांदाचाळी व प्रक्रीया उद्योग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. नाफेडकडून लाल कांदा खरेदी उत्पादकांना दिलेला मदतीचा हात आहे. केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी बैठकीत उपस्थित कांदा उत्पादक शेतकरी संघटनांच्या पदाधिकारी व प्रतिनिधींनी कांदा दर, खरेदी व निर्यात धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली. कांदा खरेदी, निर्यातबंदी, तसेच घसरलेल्या दराने शेतकरी अडचणीत आला असून, केंद्र शासनाने निर्यात धोरणासह कांदा उत्पादकांकडे गांभीर्यांने पाहण्याची गरज व्यक्त केली.