Central Railway : रेल्वे रूळाखालील खडी धसल्याने मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Central Railway service of is disrupted due to gravel under railway track nashik news

Central Railway : रेल्वे रूळाखालील खडी धसल्याने मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत

इगतपुरी (जि. नाशिक ) : मध्य रेल्वेच्या (Railway) अपमार्गावर कसारा ते उंबरमाळी दरम्यान गुरुवार ( ता.९ रोजी ) सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास रेल्वे रूळाखालील खडी धसल्याने रेल्वे रुळांची उंची कमी जास्त झाली. (Central Railway service of is disrupted due to gravel under railway track nashik news)

यामुळे कसाराहून मुंबई सीएसटीकडे जाणारी वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती.

खबरदारीचा उपाय म्हणून लांब पल्ल्याच्या गाड्या इगतपुरी रेल्वे स्टेशनवर थांबविण्यात आल्या होत्या तसेच घोटी, लहवीत स्थानकावरही काही गाड्या थांबविण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

हा खड्डा भरण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले असून यामुळे अप मार्गाची वाहतूक एक तास उशिराने सुरू आहेत तर लोकल धिम्यागतीने सुरू आहे.