CET Exam : शिक्षणशास्‍त्र अभ्यासक्रमांच्‍या सीईटी परीक्षा नोंदणीला सुरवात; अभ्यासक्रमनिहाय मुदत अशी.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

teachers

CET Exam : शिक्षणशास्‍त्र अभ्यासक्रमांच्‍या सीईटी परीक्षा नोंदणीला सुरवात; अभ्यासक्रमनिहाय मुदत अशी..

नाशिक : शिक्षणशास्‍त्र शाखेतील विविध अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी आवश्‍यक असलेल्‍या सीईटी परीक्षेच्‍या नोंदणी प्रक्रियेला सुरवात झाली आहे.

अभ्यासक्रमनिहाय सीईटी (CET) परीक्षा घेतली जाणार असून, या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे. (CET Exam Registration for Education Courses Begins nashik news)

शिक्षणशास्‍त्र शाखेत पदवी, संयुक्‍त पदवी, पदवी -पदव्‍युत्तर पदवी (संयुक्त), पदव्‍युत्तर पदवी असे विविध अभ्यासक्रम उपलब्‍ध आहेत. पात्रतानिहाय या अभ्यासक्रमांना प्रवेशाची संधी उपलब्‍ध करून दिलेली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेच्‍या नोंदणीची प्रक्रिया सध्या सुरु असून, इच्‍छुक व पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा अर्ज दाखल करण्याचे आवाहन सीईटी सेलतर्फे केले आहे.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

काही अभ्यासक्रमांच्‍या सीईटी परीक्षेसाठी मार्चच्‍या पहिल्‍या आठवड्यापासून नोंदणी प्रक्रिया सुरु असून, काही अभ्यासक्रमांसाठी नुकतीच ही प्रक्रिया सुरू झालेली आहे.

सीईटी परीक्षेच्‍या नोंदणीची अभ्यासक्रमनिहाय मुदत अशी

बी.एड. (जनरल व स्‍पेशल)---------------१८ मार्च

बी.एड.-एम.एड. (संयुक्‍त)-------------------१६ मार्च

बीए/बी.एस्सी-बी.एड. (संयुक्‍त)------------१४ मार्च

एम.पी.एड.---------------------------------१८ मार्च

टॅग्स :NashikteachersCET Exam