Chabina Utsav : सप्तशृंगगडावर आज छबिना उत्सव; ग्रहण कालावधीत तृतीयपंथीयांकडून प्रथमच होमहवन

Saptashrungi Devi Wani gad
Saptashrungi Devi Wani gadesakal

Chabina Utsav : सप्तशृंगगडावर कोजागरी पौर्णिमा उत्सव, कावडयात्रा व सामान्य भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला तृतीयपंथीयांचा मेळा अर्थात छबिना उत्सव शनिवारी (ता. २८) पन्नास हजारांवर कावडीधारक, ७५ हजारांवर पदयात्रेकरू, हजारांवर तृतीयपंथी (किन्नर) व लाखावर सामान्य भाविकांच्या उपस्थित होणार आहे.

या वर्षी ३७ वर्षांनंतर कोजागरी पौर्णिमा व खंडग्रास चंद्रग्रहणाचा योग आला असून, ग्रहण कालावधीत तृतीयपंथीयांकडून प्रथमच होमहवन विधी होणार आहे. (Chabina Utsav today at Saptshringigarh nashik news)

सप्तशृंगगडावर कोजागरी पौर्णिमेला तृतीयपंथीयांचा मेळावा भरतो. मेळाव्यासाठी गडावर राज्यभरातील तृतीयपंथी दाखल होतात. यात मुंबई, पुणे, कल्याण, नाशिकसह मध्य प्रदेशातील तृतीयपंथीयांचाही समावेश होता. पूर्वी सप्तशृंगगडावर कोजागरी पौर्णिमेस नगण्य असे तृतीयपंथी देवीच्या दर्शनासाठी येत. गडावरील शिवालय तलावालगत अर्धनारी नटेश्वरीचे मंदिर आहे.

मूर्तीचे अर्धे शरीर हे शिवाचे व अर्धे शरीर हे देवीचे असल्याने तृतीयपंथी देवीच्या पूजनाबरोबर कोजागरी पौर्णिमेनिमित्त आई सप्तशृंगीचा जागर करण्यासाठी हजारोच्या संख्येने दाखल होऊ लागले आहेत.

गेल्या ३० वर्षांत तृतीयपंथीयांची सप्तशृंगगडावर कोजागरी पौर्णिमा उत्साहात अधिक प्रमाणात बघावयास मिळत असून, आद्य स्वयंभू शक्तिपीठ व मूळ स्वरूपातील आई भगवतीची मूर्तीची प्रचिती व महिमा सर्वदूर पसरल्याने देशभरातील तृतीयपंथीयांची कोजागरी पौर्णिमेस सप्तशृंगगडावर उपस्थिती वाढू लागली आहे. त्याचबरोबर यादिवशी लाखो भाविक आदिमायेच्या दर्शनाबरोबरच तृतीयपंथीयांचा आशीर्वाद घेण्यासाठी दाखल होऊ लागले आहेत.

Saptashrungi Devi Wani gad
Nashik Renuka Mata : महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजराजेश्वरी रेणुकामाता

दीक्षा विधी

छबिना मिरवणूक संपल्यानंतर गुरू-शिष्यांचा रात्री मेळावा भरतो. यात त्यांच्या गुरूला शिष्याकडून भेट देण्याची परंपरा आहे. यात नवीन शिष्याला दीक्षा दिली जाते. दीक्षा विधी इच्छुक भाविकांचा चौक भरला जातो. देवीच्या मूर्तीला हळद-कुंकू लावले जाते.

इच्छुक भाविकाला शुचिर्भूत करून, हळद लावली जाते व त्याला गुरूच्या उजव्या मांडीवर बसवून गुरुमंत्र दिला जातो. किन्नरांसह सामान्य स्त्री- पुरुषदेखील ही दीक्षा घेऊ शकतात. यानंतर रात्रभर जागर करून देवीच्या गीतांचे गायन केले जाते.

"कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे शनिवारी (ता. २८) खंडग्रास चंद्रग्रहण असून, रात्री एक वाजून पाच मिनिटे ते दोन वाजून २३ मिनिटे असा ग्रहणाचा पर्वकाल आहे. शनिवारी दिवसभरातील आमचा शिवालय तलावावरील धार्मिक विधी, ध्वज मिरवणूक, सायंकाळचा छबिना मिरवणूक असा विधी पारंपरिकरीतीने संपन्न झाल्यानंतर ग्रहण पर्वकाळात मानवजातीच्या कल्याणासाठी सप्तशतीचे पाठ व होमहवन विधी होईल. हा विधी प्रथमच किन्नर समुदायातर्फे वणी गडावर होणार आहे." - महामंडलेश्वर पायल नंदगिरी, किन्नर आखाडाप्रमुख

Saptashrungi Devi Wani gad
Saptashrungi Devi Gad : आद्य स्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंगगड...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com