esakal | भुजबळ की भुसे? नाशिकचे पालकत्व कोणाला?
sakal

बोलून बातमी शोधा

chagan bhujbal and dada bhuse.jpg

जिल्ह्याचे पालकमंत्री यापैकी कोण होणार? याची प्रतिक्षा सर्वांनाच आहे.  शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांसह प्रशासनातही याबाबत मोठी उत्सुकता आहे. कारण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते हे कॅबीनेट दर्जाचे मंत्री म्हणून नाशिक जिल्ह्याला लाभले आहेत.

भुजबळ की भुसे? नाशिकचे पालकत्व कोणाला?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्याचे पालकमंत्री यापैकी कोण होणार? याची प्रतिक्षा सर्वांनाच आहे. कारण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते हे कॅबीनेट दर्जाचे मंत्री म्हणून नाशिक जिल्ह्याला लाभले आहेत. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यापूर्वी सलग पंधरा वर्षे मंत्री होते तर शिवसेनेचे कृषी मंत्री दादा भुसे गेली पाच वर्षे शेजारच्या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे नाशिकचे पालकत्व कोणाला हे लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांसह प्रशासनातही याबाबत मोठी उत्सुकता आहे.

"त्यांच्या" कारकिर्दीत अनेक प्रकल्पांची निर्मीती
भुजबळ यापूर्वी सलग पंधरा वर्षे मंत्री होते. भुसे गेली पाच वर्षे शेजारच्या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. छगन भुजबळ ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यांच्या कारकिर्दीत जिल्ह्यासह राज्यात अनेक लक्षणीय प्रकल्प उभे राहिले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत मंजुरी मिळालेले अनेक प्रकल्प गेल्या पाच वर्षात गिरीश महाजन असतांना गती घेऊ शकले नाहीत. विशेषतः जिल्ह्यातील पर्यटन, बांधकाम, पायाभूत सुविधा यांसह शासकीय इमारतींचे प्रकल्प त्यात आहेत. यातील काही प्रकल्पांची भुजबळ यांनी महिनाभरापुर्वीच आढावा सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत

शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार बैठक
राज्यमंत्री मंडळाचा विस्तार झाला.. खातेवाटप देखील झाले... बहुतांश मंत्र्यांनी आपला कार्यभार स्विकारला. या पार्श्‍वभूमीवर आज विधीमंडळाचे एक दिवसाचे अधिवेशन सुरु झाले. त्यानंतर  मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षातील मंत्र्यांची बैठक पक्षाध्यक्ष मुंबईत घेतील. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यांच्या पालकमंत्रीसाठी सुध्दा निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 

नक्की बघा > PHOTOS : सहनशीलतेची हद्द पार..ज्येष्ठ रुग्णाचा पाहिला अंत.. रुग्णालय सामान्यांसाठी की धनदांडग्यांसाठी?

कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता.

आगामी नाशिक जिल्हा बॅंक, विविध महत्वाच्या बाजार समित्या, देवळाली कॅन्टोनमेंट बोर्ड, नाशिक महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची तयारी भविष्यात होणार आहे. त्यादृष्टीने या दोन्ही पक्षांना विस्तारावर लक्ष केंद्रीत करावे लागले. त्यादृष्टीने पालकमंत्री कोण याची उत्सुकता दोन्ही पक्षांच्या नेते, कार्यकर्त्यांत आहे.

हेही वाचा >  दहा वर्षाच्या मुलांचा धक्कादायक प्रकार...पोलिसांसह पालकही चक्रावले..​

loading image