Nashik News : बाजार समितीच्या उत्पन्नात 4 पटीने वाढ : सभापती विनोद चव्हाण

मालेगाव तालुक्यातील जनतेने मोठ्या विश्‍वासाने कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता शिवसेना (उबाठा) उपनेते अद्वय हिरे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास दर्शवत त्यांच्याकडे सोपवली.
Malegaon Bazaar Committee
Malegaon Bazaar Committeeesakal
Updated on

मालेगाव : तालुक्यातील जनतेने मोठ्या विश्‍वासाने कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता शिवसेना (उबाठा) उपनेते अद्वय हिरे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास दर्शवत त्यांच्याकडे सोपवली. एप्रिल २०२३ पासून संचालक मंडळ कामकाज पाहत आहे.

सात महिन्यांच्या कालावधीत बाजार समितीच्या उत्पन्नात चौपट वाढ झाली. अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिस्त लावल्याने व गैरव्यवहाराला चाप बसल्याने हे शक्य झाले.

आगामी काळात सौंदाणे उपबाजार आवार लवकरच सुरू होईल असे बाजार समितीचे उपसभापती विनोद चव्हाण यांनी सांगितले. (Chairman Vinod Chavan statement 4 times increase in income of malegaon market committee Nashik News)

श्री. चव्हाण म्हणाले, बाजार समितीचे सर्व घटकांसह विरोधी संचालकांनाही विश्‍वासात घेऊन सभापती श्री. हिरे यांच्या नेतृत्वाखाली कामकाज सुरु आहे. समाजोपयोगी कामे व्हावीत या हेतूने त्यांच्या पुढाकारातून वैकुंठरथ, रुग्णवाहिका कार्यरत केली आहे.

बाजार आवारात पाणपोईसह प्रवेशद्वारांवर चौक्या करण्यात आल्या. त्यामुळे वाहन गेट पासच्या उत्पन्नात वाढ झाली. यापूर्वी अधिकारी, कर्मचारी कामकाजाकडे लक्ष देत नव्हते.

त्यांना शिस्त लागावी, शेतकरी व बाजार घटकांच्या हिताचे काम व्हावे याकरिता हजेरीसाठी थम सिस्टीम सुरु केली, त्याचा चांगला परिणाम झाला. समितीच्या मुख्य कार्यालयातून काही व्यापाऱ्यांनी वीज जोडणी घेतली होती.

ते कुठलेही बिल देत नव्हते. त्यांना ठराविक रक्कम बिलापोटी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. ४९ कर्मचाऱ्यांना गणवेश वाटप करण्यात आले आहेत.

उर्वरित कार्यालयीन ३० कर्मचाऱ्यांना २६ जानेवारीला गणवेश देण्यात येईल. शिपाई, पहारेकरी यांना खाकी गणवेश तर कार्यालयीन कर्मचाऱ्यांना स्काय ब्लू गणवेश देण्यात येणार आहे.

शिवार खरेदीला आळा घालू

बाजार समितीला मका व धान्य प्रत तपासणीसाठी आठ ते दहा लाखाची अत्याधुनिक यंत्रसामग्री मिळूनही ती धूळ खात पडली होती. आमच्या संचालक मंडळाने समिती आवारातील एक्साईजचे कार्यालय पाठपुरावा करून खाली केले.

या यंत्रसामुग्रीसह येथे आता शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी धान्य तपासणी प्रयोगशाळा लवकरच सुरू करणार आहोत. तालुक्यातील शिवार खरेदी रोखण्यासाठी एक विशेष पथक स्थापन केले होते.

यात १८ व्यापारी शिवार खरेदी करताना मिळाल्याने या व्यापाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या. यातील आठ व्यापाऱ्यांकडून ७ लाख ३४ हजार बाजार शुल्क दंड वसूल करण्यात आला. उर्वरित व्यापाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

शुल्क न भरल्यास संबंधितांचा माल जप्त करण्यात येईल. अनेक वर्षांपासून अशी कारवाई झाली नव्हती. त्यातच बाजार समिती प्रशासनाने सर्व शुल्क धनादेशाच्या स्वरूपात घेतले.

Malegaon Bazaar Committee
Nashik: मंगल कार्यालये धार्मिक कार्यक्रमासाठी मिळणार मोफत! राममंदिर प्राणप्रतिष्ठा दिनी कार्यालयांत घुमणार जय श्रीराम!

श्रीराम मंदिर ट्रस्टचे औदार्य

सौंदाणे उपबाजार समिती सुरू करण्यासाठी सौंदाणे येथील श्रीराम मंदिर ट्रस्टने बाजार समितीला दोन एकर जागा बक्षीसपत्र करून दिल्याने समितीची जागा

स्वमालकीची झाली आहे. उपबाजारासाठी उर्वरित आठ एकर जागा ट्रस्टकडून समितीने भाडेतत्त्वावर घेतली आहे. त्याचा अकरा वर्षाचा करार करण्यात आला आहे.

उपबाजार लवकरच सुरू होईल. येथे कमान, पाण्याची सुविधा, मोऱ्यांची कामे झाली आहेत. कुंपण व काही भागात चारी करण्यात आली. जमीन सपाटीकरण झाले असून व्यापारी बांधवांना जागा वाटप करण्यात आल्या आहेत.

उत्पन्नात चौपट वाढ

समितीचे आठवडे बाजाराचे उत्पन्न यापूर्वी अकरा ते बारा हजार रुपये होते. ते पन्नास हजार रुपयांवर पोहोचले आहे. यापूर्वी वाहन गेट पासपोटी वर्षाला साडेपाच लाख रुपये जमा होत होते. सात महिन्यात ही वसुली ७ लाख ४० हजार रुपये झाली आहे.

बकरी ईदच्या बाजारात ईदपूर्वी महिनाभराचे उत्पन्न पावणेदोन लाख मिळायचे. यावेळी हे उत्पन्न ८ लाख ७४ हजारावर पोहोचले आहे. बाजार शुल्क बाजार समितीत येणाऱ्या मालाचे आवकवर अवलंबून आहे. सात महिन्यातच चारपट उत्पन्न वाढले आहे असेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.

Malegaon Bazaar Committee
Nashik: लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा ‘फॉर्म्युला’ निश्‍चित? नाशिकमध्ये ठाकरे, तर दिंडोरीत NCP शरद पवार गटाकडून तयारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com