Nashik News : अडीच वर्षांनंतर होणार ‘झूम’ बैठक; निमाच्या प्रयत्नांना यश!

Dhananjay Bele, Govind Jha, Ravindra Zope, Rajendra Vadnere, Srikant Patil, Hemant Khond etc. while giving a statement to the Collector.
Dhananjay Bele, Govind Jha, Ravindra Zope, Rajendra Vadnere, Srikant Patil, Hemant Khond etc. while giving a statement to the Collector. esakal

सातपूर (जि. नाशिक) : उद्योजकांचे ज्वलंत आणि प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेली जिल्हा उद्योग मित्र (ZUM) ची बैठक त्वरेने घेण्यात यावी या मागणीचे निवेदन नाशिक इंडस्ट्रीज ॲन्ड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (NIMA) चे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी गंगाथरन. डी यांना सादर केल्यानंतर ही बैठक पुढील आठवड्यात घेण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याने उद्योजकांच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे. (Zilla Udyog Mitra Zum meeting will be held after two and half years nashik news)

जिल्ह्यातील उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी निमा ही संघटना प्रयत्न करते. या संघटनेचे साडेतीन हजारांहून अधिक सदस्य आहेत. या उद्योजकांचे अनेक मूलभूत प्रश्न आहेत. विविध समस्याही आहेत. त्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणारी झूम (जिल्हा उद्योग मित्र) महत्त्वाची भूमिका बजावत असते. कारण या बैठकीस सर्व यंत्रणांचे अधिकारी आवर्जून उपस्थित राहतात आणि उद्योजकांच्या प्रश्नांची तातडीने उकल होण्यास मदत होते.

परंतु गेल्या अडीच वर्षांत ही बैठक न झाल्याने उद्योजक संभ्रमात आहेत. निमाची सूत्रे हाती घेतल्यानंतर धनंजय बेळे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे या बैठकीचा आग्रह धरल्यानंतर या बैठकीचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र काही कारणांमुळे पुन्हा ती लांबणीवर पडली होती. आता पुन्हा एकदा उद्योगमंत्र्यांशी चर्चा केली आणि त्यांनी निर्देश दिल्यानंतर जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना प्रत्यक्ष भेट घेतली.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

Dhananjay Bele, Govind Jha, Ravindra Zope, Rajendra Vadnere, Srikant Patil, Hemant Khond etc. while giving a statement to the Collector.
March End Recovery : बँका, पतसंस्थांची कर्जवसुली जोरात; मार्च एंडमुळे वसुलीचा तगादा वाढल

उद्योगांच्या विस्तारासाठी तसेच नवीन उद्योगांना पायघड्या टाकण्यास आवश्यक व संपादित करावयाची जमीन, औद्योगिक वसाहतीतील सुरक्षा व्यवस्था, ग्रामीण भागातील उद्योजकांच्या असलेल्या समस्या, प्रायव्हेट इंडस्ट्रिअल एरियामधील उद्योजकांच्या व उद्योगांच्या विविध समस्या, प्रलंबित सबसिडी, विजेचे असलेले विविध प्रश्न, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे निगडित प्रश्न, पथदीप, नालेसफाई, पाण्याची कमतरता आदी प्रश्नांबाबत तातडीने मार्ग काढण्यास झूम बैठक तातडीने घेण्यात यावी व सदरील बैठक पूर्वापार परंपरेनुसार निमा कार्यालय सातपूर या ठिकाणी घ्यावी अशीही मागणी या वेळी करण्यात आली.

बैठकीसाठी त्यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर पुढील आठवड्यात ही बैठक घ्यावी, असा शेरा मारल्याने आता उद्योजकांचे प्रलंबित प्रश्न लवकरच सुटतील, असा विश्वास बेळे यांनी व्यक्त केला. शिष्टमंडळात निमा सदस्य गोविंद झा, रवींद्र झोपे, राजेंद्र वडनेरे, श्रीकांत पाटील, हेमंत खोंड आदींचा समावेश होता.

Dhananjay Bele, Govind Jha, Ravindra Zope, Rajendra Vadnere, Srikant Patil, Hemant Khond etc. while giving a statement to the Collector.
Nashik News : गोठेधारकांना या तारखेपर्यंत परवाना नूतनीकरणाची संधी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com