Nashik News : चंदनपुरी यात्रेत ढोलकीची जादू ओसरली; Electronic खेळणीच्या मागणीने विक्रीवर परिणाम

Yatra drum shop
Yatra drum shopesakal

येसगाव (जि. नाशिक) : गावोगावी भरणाऱ्या यात्रा ही सर्वांसाठी हवीहवीशी असते. यात लहान मुलांपासून ते महिला, गृहपयोगी वस्तु विक्रीसाठी असतात. यात बच्चे कंपनीचे आवडती खेळणी म्हणजे ढोलकी.

मात्र चंदनपुरी येथे सुर असलेल्या यात्रेच्या निमित्ताने बच्चे कंपनीत असलेली ढोलकीची जादू ओसरली असल्याचे येथील ढोलकी विक्रते यांचे म्हणणे आहे. यात्रा पूर्वार्धात संपली तरी पाहिजे तशी अपेक्षित विक्री झाली नाही. (Chandanpuri Yatra no demand for dholki Demand for electronic toys affects sales Nashik News)

अनेक वर्षापासून ग्रामीण भागातील लहान-मुलांमध्ये ढोलकीचे एक वेगळे आकर्षण असते. प्रत्येक यात्रेत ढोलकीचे दुकान हे असतेच. यात्रेच्या निमित्ताने विक्रेते शेकडो ढोलकी हमखास विक्री करत असतात. मात्र वाढत्या डिजिटल साधनांमुळे आता या ढोलकीची जादू ओसरत चालली आहे.

काही वर्षापूर्वी ढोलकी यात्रेत कच्चा माल आणून जागेवर तयार केल्या जात होत्या. पत्रा, कातडे, ढोलकी तयार करण्यासाठी वापरत जात होते. मात्र जसे जसे खेळण्यात बदल होऊ लागले तसे ढोलकीच्या वस्तु बदलत गेल्या. ढोलकीचे विविध प्रकार वाढले.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Yatra drum shop
Rajya Balnatya Spardha : नाशिक विभागात अहमदनगरची बाजी ‘अजब लोट्यांची महान गोष्ट’ प्रथम

परंतु आता या ढोलकीच्या मागणीत प्रचंड घट झाली आहे. यात्रेचे स्वरूपही बदलू लागले आहे .तसेच ढोलकीचे स्वरूप बदलत गेले. यात्रेतील खेळण्यासाठी मुलांच्या मनावर मोबाईल, टीव्हीचा परिणाम झाल्यामुळे ढोलकी सारख्या खेळणीचे महत्त्व कमी झाले आहे.

' इलेक्ट्रिक सारख्या स्वयंचलित खेळणी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत. त्या मुलांना आकर्षित करतात. त्यामुळे आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून पाहिजे तशी विक्री होत नाही .'- जलाल उद्दीन , ढोलकी विक्रेता, उत्तर प्रदेश

Yatra drum shop
Kamgar Kalyan Natya Spardha : खऱ्या मैत्रीचा अर्थ सांगणारी नाट्यकृती फ्रेंडशिप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com