Kamgar Kalyan Natya Spardha : खऱ्या मैत्रीचा अर्थ सांगणारी नाट्यकृती फ्रेंडशिप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

A scene from the play Friendship.

Kamgar Kalyan Natya Spardha : खऱ्या मैत्रीचा अर्थ सांगणारी नाट्यकृती फ्रेंडशिप

नाशिक : खरी मैत्री काय असते, ती कशी असावी याचे उत्तम उदाहरण सांगणारी नाट्यकृती म्हणजे 'फ्रेंडशिप. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ६८ व्या नाट्य महोत्सवात कामगार कल्याण केंद्र, सिन्नरतर्फे हे नाटक सादर झाले. राजेंद्र पोळ लिखित या नाटकाचे दिग्दर्शन आणि प्रकाशयोजना विक्रम गवांदे यांनी केली. (Kamgar Kalyan Natya Spardha Friendship is drama about true friendship nashik news)

हे नाटक संपूर्णतः मैत्री या विषयावर आधारित आहे. नाटकातील पात्र यश आणि कविता या घनिष्ठ मित्रांची गोष्ट या संहितेत लेखकाने मांडली आहे. एका खोट्या प्रेमाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या कविताला वाचविण्यासाठी यश क्षणोक्षणी प्रयत्न करत असतो.

त्याच्या या प्रयत्नातून ती सावरते आणि नवी उमेद घेऊन उभी राहते. मैत्रीच्या नात्यातील खरेपणा आणि विश्वास याचा सार्थ मिलाप सांगणारी ही नाट्यकृती आहे. श्रद्धा कुलकर्णी, सुनील पानझडे, गीता शिंपी, अक्षय्य निकम, अंकिता मुसळे या कलावंतांनी या नाटकात भूमिका साकारल्या. दीपिका विक्रम यांनी नाटकाचे नेपथ्य, तर गीता शिंपी यांनी पार्श्वसंगीत साकारले.

हेही वाचा: Kamgar Kalyan Natya Spardha : अबसर्ड प्रकारातील नाट्यकृती ‘क्रकचबंध’

पात्रांच्या वेशभूषा विक्रम गवांदे यांनी तर रंगभूषा श्रद्धा कुलकर्णी, पल्लवी बागूल यांनी साकारल्या. योगेश गडाख आणि विजिकिषा नाट्य अकादमी यांनी रंगमंच साहाय्य केले. अनिल बोरसे यांनी निर्मिती प्रमुख म्हणून काम पाहिले.

स्पर्धेत शनिवारी (ता. १४) जळगाव कामगार कल्याण केंद्रातर्फे ‘मुसक्या’ हे नाटक सादर होणार असून, लेखन आणि दिग्दर्शन हेमंत कुलकर्णी यांचे आहे.

हेही वाचा: Rajya Balnatya Spardha : नाशिक विभागात अहमदनगरची बाजी ‘अजब लोट्यांची महान गोष्ट’ प्रथम

टॅग्स :NashikdramaLabor Laws