Chandanpuri Yatrotsav : चंदनपुरीत गर्दीचा येळकोट; लाखावर मल्हारभक्त खंडेरायाच्या चरणी नतमस्तक

Crowd of devotees to see the temple.
Crowd of devotees to see the temple.esakal

मालेगाव/ येसगाव (जि. नाशिक) : रविवारच्या पार्श्वभूमीवर चंदनपुरी यात्रेत गर्दीचा येळकोट झाला. दिवसभरात लाखावर मल्हारभक्त खंडेरायाच्या चरणी नतमस्तक झाले. यात्रेत सलग तीन दिवसांपासून गर्दी होत आहे. त्यामुळे यात्रेतील आर्थिक उलाढाल वाढली असून, व्यावसायिक समाधानी आहेत. दिवसभर चंदनपुरीत ‘येळकोट येळकोट जय मल्हारचा’ गजर निनादत होता. (Chandanpuri Yatrotsav lakh of devotees crowd nashik news)

रविवारच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच भाविकांची चंदनपुरीकडे रीघ लागली होती. दुपारी विक्रमी गर्दी उसळली. त्या दृष्टीने ग्रामपंचायत, जय मल्हार ट्रस्ट, पोलिस प्रशासन, पाणीपुरवठा, वीज कंपनी, आरोग्य खात्याकडून नियमित लक्ष ठेवून भाविकांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

चंदनपुरीचा यात्रामहोत्सव पौष पौर्णिमा शुक्रवारपासून सुरू झाला. सलग तीन दिवस मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. सकाळपासूनच दर्शनासाठी बाऱ्या लागल्या होत्या. दुपारी गर्दी झाल्याने दर्शनास किमान दोन तास लागत होते. सुटीचा दिवस असल्यामुळे भाविकांची संख्या वाढली. भाविकांनी मोठ्या प्रमाणावर खोबरे-भंडाऱ्याची उधळण केली.

सायंकाळी उशिरापर्यंत गर्दी कायम होती. देव भेटविणे, तळी भरणे, कोटम भरणे आदी धार्मिक कार्यक्रम करणाऱ्या कुटुंबांची संख्या जास्त होती. बाहेरगावाहून आलेले कुटुंबीयांनी दगडाच्या चुली मांडून स्वयंपाक करीत देवाचा कोटम भरला. काहींनी घरूनच नैवेद्यासाठी स्वयंपाक करून आणला होता.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Crowd of devotees to see the temple.
Nashik News: नाकाला रुमाल लावून करावा लागतो प्रवास; पंचवटी एक्स्प्रेसची स्वच्छता करण्याची मागणी

खोबरे, भंडाराची उधळण करत खंडेरायाचा जयजयकार केला जात होता. व्यावसायिकांचाही व्यवसाय मोठा वाढला. पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. गिरणा पुलापासून थेट चंदनपुरीपर्यंत ठिकठिकाणी वाहतूक पोलिस नियुक्त केले होते. दर्शनासाठी चांगली सुविधा मिळत असल्याने भाविक समाधान व्यक्त करीत होते.

ट्रस्ट व ग्रामपंचायतचे पदाधिकारी व्यवस्थेत सक्रिय होते. मंदिर परिसरात व यात्रेत तळी भरणे, तसेच बानूबाईच्या मंदिरापर्यंत वाघ्या- मुरळीकडून भाविक धार्मिक कार्यक्रम करून घेत होते. त्यामुळे वाघ्या-मुरळीसाठी पर्वणी होती.

"चंदनपुरीत आलेल्या भाविकांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेऊन भुरटे चोर भाविकांचे मोबाईल व इतर वस्तू लांबवित आहेत. भाविकांनी दागिने, मोबाईल व इतर वस्तू मंदिर परिसरात असलेल्या ट्रस्टच्या कार्यालयात जमा कराव्यात. रीतसर पावती घ्यावी. दर्शन झाल्यानंतर पावती दाखवून आपल्या वस्तू घेऊन जाव्यात." -सतीश पाटील, अध्यक्ष, जय मल्हार ट्रस्ट चंदनपुरी

Crowd of devotees to see the temple.
Nashik News : मालेगावची ओळख सांगणाऱ्या Malegaon Rap Song-2ची लाँचिंग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com