women action
women actionesakal

Nashik News : चंडीकापूरच्या चंडिकांचा दारुबंदीसाठी एल्गार!

Nashik News : सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या चंडीकापूर ता. दिंडोरी येथील रणरागिणींनी गावात अवैध दारु विक्री करणाऱ्या विरुध्द रुद्रावतारधारण करीत गावात दारुबंदीचा एल्गार केला आहे. (Chandikapur women agitation to ban alcohol Nashik News)

वणी - नांदुरी रस्त्यावरील व सप्तशृग गडाच्या पायथ्याशी असलेल्या चंडीकापूर परीसरात गेल्या काही दिवसांपासून येथे अवैधपणे दारूची सर्रास विक्री केली जात असल्याचा प्रकार घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे.

गावातील युवक दारूच्या आहरी जात असल्याने व्यसनाधिनता वाढली आहे. त्यामध्ये काहीचा दारुने अपघाती मृत्यूही झाला असल्याचे घटना घडल्या आहेत. तसेच व्यवसनामुळे कौटुंबिक व गावाच्या शातंतेला बाधा पोहचत आहे.

याबाबत चंडीकापूर येथील महिलांनी गावाच्या प्रवेशद्वाराजवळच एका टपरीवजा दुकानात अवैध देशी-विदेशी मद्याची विक्री होत असल्याबाबत कळाल्याने गावातील महिला सरंपच नंदाबाई कुवर, उपसरपंच बाळु जोपळे, ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती मोंढे, महिला बचत गटाच्या महिला भारतीबाई जोपळे, सुनिता बागुल, मंजुळाबाई मोंढे, रंजना कुवर, सविता पवार, सविता मोंढे, सिंधू गायकवाड, कौशल्या चव्हाण, उज्वला आहेर, मीरा चव्हाण आदी महिलांसह ग्रामस्थांनी होऊन अवैध विक्री बंद करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

women action
Nashik Crime: पाकिट, दागिने चोरणारी महिलांची टोळी गजाआड; सिन्नर, निफाड, मालेगाव येथेही गुन्हे

यावेळी टपरीचालक व गावकरी यांच्यात बराच वेळ बाचाबाची झाली. घटनेची माहिती मिळताच वणी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रविण उदे, महिला पोलिस, पोलिस हवालदार चव्हाण यांनी घटनास्थळी येत टपरीची झाडाझडती घेतली.

यावेळी टपरीचालकास दारु विक्री न करण्याबाबत समज देवून ग्रामस्थांची परत तक्रार आल्यास कारवाई करण्याची ताकीद दिली. दरम्यान चंडीकापूर ग्रामपंचायतीच्यावतीने गावात दारुबंदीची अंमलबजावणी व अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

women action
Nashik Accident : समृद्धीच्या शिर्डी ते भरविहिर टप्प्यात वाहनांचे अपघात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com