esakal | पाठित खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकविणार; मालेगावात बावनकुळे यांचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Malegaoan

पाठित खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकविणार; बावनकुळे यांचा इशारा

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : राज्यातील तरुणांचा ओढा भाजपकडे आहे. राज्यातील तिघाडी सरकारमुळे यंत्रणेचा खेळखंडोबा झाला आहे. शिवसेनेने विश्‍वासघात केला, राज्यात युवती व विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या विश्वासघातकी सरकारला धडा शिकवू. भाजप व युवा मोर्च्याकड़ून जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत. मतदान अधिकार प्राप्त झालेल्या अराजकीय युवकांना जोडण्याचे काम या दौऱ्याच्या माध्यमातून सुरु आहे. पाठित खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे, त्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन माजी ऊर्जामंत्री तथा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले. (chandrasekhar Bavankule criticized the state government at Malegaon)

कसमादे दौऱ्यात बावनकुळे व युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. आघार बुद्रुक येथील पदाधिकारी बैठक, सटाणा नाका भागातील शाखा उद्‌घाटन, जिल्हा संघटन सरचिटणीस देवा पाटील यांच्या बारा बंगला भागातील स्वागत समारोह या ठिकठिकाणी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. युवा वारियर्स मोहिमेच्या माध्यमातुन १८ ते २५ वयोगटातील अराजकीय युवकांना जोडण्यासाठी हा दौरा यशस्वी होत आहे. त्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा: नाशिक : कारवर झाड कोसळून तीन शिक्षकांचा जागीच मृत्यू!

येथील सटाणा नाका भागात भाजप गटनेते सुनील गायकवाड, शहराध्यक्ष मदन गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. युवा मोर्चा शहराध्यक्ष युवराज गीते, दीपक गायकवाड यांच्या पुढाकाराने सटाणा नाका व सोयगाव नववसाहत भागातील तीन शाखांचे उद्‌घाटन बावनकुळे व पाटील यांच्या हस्ते पार पडले. स्वागत समारंभात जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांनी पक्ष कुठलाही उमेदवार आयात करणार नाही असे सांगितले. जिल्हा परिषद सदस्या मनिषा पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. दादा जाधव, लकी गिल, निलेश कचवे, दीपक पवार, हरिप्रसाद गुप्ता, भरत पोफळे, नंदूतात्या सोयगांवकर, संजय काळे, विजय देवरे, सुधीर जाधव, सुनील शेलार, नितिन पोफळे, राजेन्द्र शेलार, भरत बागुल, विजय भावसार, दिनेश अग्रवाल, किशोर गुप्ता, कुशाभाऊ अहिरे, सर्जेराव पवार, प्रशांत पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

(chandrasekhar Bavankule criticized the state government at Malegaon)

हेही वाचा: वाडीवऱ्हे जवळ भीषण अपघातात नाशिकचे तीघे जागीच ठार; २ जण गंभीर

loading image