Bazar Samiti Result : चांदवड बाजार समितीवर ‘लोकामान्य’ चे वर्चस्व

Market Committee nashik
Market Committee nashikesakal

Nashik News : कृषी उत्पन्न बाजार समितीत विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेरांना माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या लोकमान्य परिवर्तन पॅनलने धक्का देत बाजार समितीवर परिवर्तन घडविले आहे. (Chandwad Bazar samiti election won Lokmanya Parivartan Panel in nashik news )

कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या लोकमान्य परिवर्तन पॅनलने दहा जागा मिळविल्या. तर डॉ. राहूल आहेरांना, डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्या शेतकरी विकास पॅनलला सात जागांवर समाधान मानावे लागले. यामुळे अनेक वर्षानंतर चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये परिवर्तन झाले आहे. अपक्ष उमेदवारी करून विजयश्री खेचून आणत प्रहारच्या गणेश निंबाळकर यांनी सर्वांनाच धक्का दिला आहे.

माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन आहेर नेतृत्वाखाली लोकमान्य परिवर्तन पॅनलचे सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून डॉ. सयाजीराव गायकवाड (५८८), कारभारी आहेर (५०३), डॉ. राजेंद्र दवंडे (४९०), सहकारी संस्था इतर मागास प्रवर्गातून शिरीषकुमार कोतवाल (६३१) मते, सहकारी संस्था महिला राखीव प्रवर्गातून डॉ.वैशाली जाधव (६६१), मीना शिरसाठ (४३६), भटक्या विमुक्त जमाती प्रवर्गात विक्रम मार्कंड (५१५) तर ग्रामपंचायत गटातील सर्वसाधारण प्रवर्गात संजय जाधव (४११), नितीन आहेर (४५४), व्यापारी गटातून सचिन अग्रवाल (१७०) विजयी झाले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Market Committee nashik
Market Committee Election Result : मालेगावात नव्या नेतृत्वाला संधी

आमदार डॉ.राहुल आहेर व डॉ.आत्माराम कुंभार्डे यांच्या शेतकरी विकास पॅनलचे सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून डॉ.आत्माराम कुंभार्डे (५९१), पंढरीनाथ खताळ (४६३), सुखदेव जाधव (५२५), योगेश ढोमसे (५१२), ग्रामपंचायत गटातील अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात वाल्मिक वानखेडे (३९३) व्यापारी गटातून सुशील पलोड (१५८), हमाल मापारी गटातून रवींद्र पवार (७५) विजयी झाले. ग्रामपंचायत गटातील आर्थिक दुर्बल प्रवर्गातून अपक्ष गणेश निंबाळकर (२९५) विजयी झाले.

गीता झाल्टेचा एका मतांनी पराभव

शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवार गीता झाल्टे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. मीना शिरसाठ यांना ५३७ व गिता झाल्टे यांना ५३५ मते मिळाली. यानंतर गीता झाल्टे यांनी फेरमतमोजणीचा अर्ज दिला. नंतर या जागेसाठी फेरमतमोजणी करण्यात आली. त्यात मीना शिरसाठ याचे एक मत कमी होऊन त्यांना ५३६ मते मिळाली तर गीता झाल्टे यांचे ५३५ मते राहिली. त्यामुळे मीना शिरसाठ यांना विजयी घोषित करण्यात आले.

Market Committee nashik
Nashik MNS News : एकेकाळी मनसेची ताकद वाढविणारा `हा` नेता पुन्हा स्वगृही परतणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com