Market Committee Election Result : मालेगावात नव्या नेतृत्वाला संधी

Dada Bhuse vs Advay Hirey
Dada Bhuse vs Advay Hireyesakal

Nashik News : राज्याचे लक्ष लागून असलेल्या येथील मालेगाव बाजार समिती निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापितांच्या २० वर्षाच्या सत्तेला धोबीपछाड देत नवनेतृत्वाला संधी दिली. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत शिवसेना (उद्धव ठाकरे) उपनेते अद्वय हिरे यांनी महाविकास आघाडीची मोट बांधत नवख्या उमेदवारांना संधी देत मिळविलेला दणदणीत विजय लक्षणीय आहे. ( Market Committee Election Result Advay Hire victory by giving opportunities to new candidates nashik news )

पालकमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखालील आपलं पॅनलचा पराभव त्यांना आत्मपरीक्षण करायला लावतानाच धक्का देणारा ठरला आहे. राज्यातील बदलत्या घडामोडी व मुख्यमंत्री शिंदे विरुद्ध ठाकरे गटातील संघर्षाच्या पाश्‍र्वभूमीवर मिळालेला विजय हिरे गटाचे मनोबल वाढविणारा ठरला आहे.

बाजार समितीतील दोन दशकातील सत्ता राखण्यासाठी श्री. भुसे यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यासाठी अनेक डावपेच आखत हिरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. तथापि सुरवातीलाच आमदार सुहास कांदे यांच्या समर्थकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास असमर्थता दर्शविल्याने माशी शिंकली. शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले.

श्री. कांदे व त्यांचे समर्थकांचे मन वळविण्यात दमछाक झाली. अखेरच्या टप्प्यात श्री. कांदे यांनी प्रचारात सहभाग घेऊनही निमगाव व झोडगे मतदान केंद्रावर श्री. हिरे यांच्या पॅनलच्या उमेदवारांना मिळालेली मते वेगळाच संकेत देतात. याशिवाय सत्तारुढ गटाविरुध्द सामान्य मतदारांमध्ये नाराजी असल्याचे बघावयास मिळाले. विद्यमान सभापती, उपसभापती यांच्यावरील टिकेचा मुद्दाही कळीचा ठरला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Dada Bhuse vs Advay Hirey
सह्याद्रीचा माथा : नेत्यांची पत ठरवणारी बाजार समिती निवडणूक

समितीच्या कारभाराकडे श्री. भुसे यांनी फारसे लक्ष दिले नव्हते. भुसेंच्या समर्थकांनीही एकमेकांचा हिशेब चुकता केला. ग्रामपंचायत गटात बहुमत असूनही झालेला पराभव भुसे गटाला जिव्हारी लागणारा आहे.

श्री. हिरे यांनी शिवसेना प्रवेश केल्यापासून कार्यशैलीत मोठा बदल केला आहे. सामन्यांमध्ये मिसळत अहंकार बाजूला सारत सर्वांना सोबत घेण्याची वृत्ती अनेकांना भावली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची फळी सक्रिय झाली.

बारा बलुतेदार मित्र मंडळाचे संस्थापक बंडूकाका बच्छाव, भाजपचे सुनील गायकवाड, कॉंग्रेसचे डॉ. तुषार शेवाळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. जयंत पवार अशा सर्वांची एकजूट कामी आली. श्री. हिरे यांनी स्वत: निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने कार्यकर्त्यांना बळ मिळाले. श्री. हिरे यांच्याकडून मतदारांना मोठ्या अपेक्षा आहेत.

Dada Bhuse vs Advay Hirey
Market Committee Election Result: महाविकास आघाडीचा झंझावात, भुसेंना धक्का!

प्रस्थापितांना अस्मान दाखवितांना मतदारांनी मावळते सभापती राजेंद्र जाधव व उपसभापती सुनील देवरे, ज्येष्ठ नेते मधुकर हिरे यांच्यासह हिरे गटातील युवराज गोलाईत या मातब्बरांचा पराभव केला.

त्याचवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील संदीप पवार, विनोद चव्हाण, राजेंद्र पवार या तरुणांना संधी मिळाली. सर्वपरिचित नंदलाल शिरोळे यांनी आपला बाज कायम राखला. श्री. हिरे यांनी शहराबाहेर जागा घेऊन बाजार समिती करण्याचे स्वप्न दाखविले आहे. हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागेल.

चांगले कामाचे आवाहन

विजयश्री मिळाली तरी समितीचे कामकाज त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. समितीत पाय ठेवायलाही जागा शिल्लक नाही. मका लिलाव पोलिस कवायत मैदानावर होतात. शेतकरी हिताऐवजी व्यापारी गाळे बांधून समितीचे झालेले व्यापारीकरण, नोकर भरती, आवार दुरवस्था, सुविधा, रस्त्यांचा अभाव, चिखलाचे साम्राज्य, विकास कामांचा ठणठणाट आहे.

Dada Bhuse vs Advay Hirey
Market Committee Election : पिंपळगावला कदम बंधूमध्ये जुंपली; राजकीय लढाई मुद्द्यांवरून गुद्द्यावर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com