Nashik News : विकास आराखड्यांच्या निकषात ग्रामपंचायतींसाठी झाला बदल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gram panchayat news

Nashik News : विकास आराखड्यांच्या निकषात ग्रामपंचायतींसाठी झाला बदल!

नाशिक : ग्रामपंचायतीतर्फे गावात राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व विकासकामांचा आराखडा तयार करण्याच्या निकषात बदल करण्यात आला आहे. नव्या निकषानुसार गावाने दोन प्रमुख योजना किंवा उपक्रम हाती घेऊन त्यावर मिळणाऱ्या निधीपैकी ५० टक्के निधी खर्च करावयाचा आहे.

यासंदर्भात ग्रामपंचायतींच्या कार्यशाळा घेण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना दिल्या आहेत. (change in criteria of development plans for Gram Panchayats Nashik News)

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

हेही वाचा: Nashik News | वायुप्रदुषण नियंत्रणासाठी हवी नागरिकांची साथ : NMC आयुक्‍त डॉ.पुलकुंडवार

केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ९ संकल्पना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार सन २०२२-२३ पासून प्राधान्याने त्याची अंमलबजावणी करण्याचे निश्चित केले असून या ९ संकल्पनांच्या आधारे ग्रामपंचायतीने विकास आराखडे तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

परंतु त्यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. ९ संकल्पनांपैकी ग्रामसभेत केवळ एक किंवा दोनच योजना किंवा उपक्रम निश्चित करून त्यावर वित्त आयोगाच्या बंधित निधीतून खर्च करावयाचा आहे. जलसमृध्द गाव, स्वच्छ व हरित गाव या दोन संकल्पनाचाही त्यामध्ये समावेश करता येईल.

या दोन नवीन योजनांची माहिती ई-ग्रामस्वराज पोर्टलवर भरणे बंधनकारक आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींच्या कार्यशाळा घेण्याच्या सूचना करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सर्व ग्रामपंचायतीनी आपले विकास आराखडे मुदतीत पूर्ण करून ई- ग्रामस्वराज पोर्टलवर अपलोड करावेत, असेही सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: Nashik Graduate Constituency : सत्यजित तांबे यांचे पारडे अधिक जड! शिक्षकभारतीचा बिनशर्त पाठिंबा