esakal | नाशिक : मनसेत रंगलाय संगीत खुर्चीचा खेळ! उपाध्यक्ष बदलावरून पक्षात असंतोष
sakal

बोलून बातमी शोधा

MNS

नाशिक : मनसेत उपाध्यक्षांची कटी पतंग! पक्षात असंतोष

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर संघटना बळकटीचा भाग म्हणून मनसेकडून (MNS) शहर कार्यकारिणीतील महत्त्वाच्या पदांवर बदल करण्यात आल्यानंतर आता दुसऱ्या फळीतील उपाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्याने असंतोष निर्माण झाला आहे. बदल करताना यापूर्वी सहाऐवजी तीनच उपाध्यक्ष ठेवले जाणार असल्याने असंतोषात अधिकच भर पडली आहे.

तब्बल साडेचार वर्षानंतर राज ठाकरे देताय संघटनेकडे लक्ष

सन २०१२ मध्ये महापालिकेत सत्तेवर आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सन २०१७ च्या निवडणुकीत फारसे यश पदरात पडले नाही. निवडणुकीपूर्वी मनसेचे तीसहून अधिक नगरसेवक भाजप, शिवसेनेत प्रवेशकर्ते झाले. निवडणुकीत चाळीस वरून नगरसेवक संख्या घटून पाचपर्यंत पोचली. आता सन २०२२ मध्ये महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संघटनात्मक बदल घडवून आणले आहेत. साडेचार वर्षानंतर राज ठाकरे यांनी संघटनेकडे लक्ष देताना घडवून आणलेले बदल अनेकांच्या पचनी पडले नाही. मुंबईच्या धर्तीवर १२२ शाखाध्यक्षांची नियुक्त करण्यात आली. शाखाध्यक्ष हाच महत्त्वाचा घटक असल्याचे समजून तळागाळापर्यंतचा कार्यकर्ता मोठा करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर संघटनेच्या मुख्य पदांमध्ये बदल करताना तेच चेहरे समोर आणले.

हेही वाचा: "मी जन्मदात्रीच..वैरीण नाही; मन घट्ट करून लेकीला संपविते.."

मनसेत रंगलाय संगीत खुर्चीचा खेळा

शहराध्यक्ष पदावरून अंकुश पवार यांना बाजूला करीत जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. यापूर्वी जिल्हाध्यक्ष असलेले दिलीप दातीर यांच्याकडे शहर प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली. प्रदेशचे नेते असलेले ॲड. रतनकुमार ईचम यांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. जिल्हाध्यक्ष असलेले अनंता सूर्यवंशी यांना पदावरून हटविण्यात आले. शहराध्यक्ष पदाचे दावेदार असलेले सचिन भोसले यांना कुठलेच पद दिले न गेल्याने त्यांची नाराजी पक्षाला भोवण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्याकडे समन्वयकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. संगीत खुर्चीच्या या खेळानंतर आता उपाध्यक्ष बदलाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

हेही वाचा: IPL बेटींगसाठी लाच मागणाऱ्या PSIला पोलिसांनी ठोकल्या बेड्या


तीन उपाध्यक्षांची होणार नियुक्ती

पूर्वी विभागनिहाय सहा उपाध्यक्ष होते, परंतु आता नव्याने बदल करताना तीन विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी एक असे तीन उपाध्यक्ष नियुक्त केले जाणार आहे. नाशिक रोड- पंचवटी विभागासाठी एक, सातपूर- सिडको विभागासाठी एक, तर पश्‍चिम- पूर्व विभागासाठी एक उपाध्यक्ष नियुक्त केला जाणार आहे. अडचणीच्या काळात ज्यांनी पक्षाचे अस्तित्व टिकविण्याचे काम केले त्यांनाच पदावरून दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याने यातून असंतोष वाढताना दिसत आहे.

loading image
go to top