esakal | "मी जन्मदात्रीच..वैरीण नाही; मन घट्ट करून लेकीला संपविते.." सुसाईड नोटमध्ये मातेची व्यथा
sakal

बोलून बातमी शोधा

mother daughter

"मी जन्मदात्रीच..वैरीण नाही; मन घट्ट करून लेकीला संपविते.."

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : ''मी जन्मदात्री आईच, पण हे जग खूप वाईट... जन्म देताना जसा त्रास झाला तसे मन घट्ट करून मी हा निर्णय घेते आहे.. मी जन्म दात्रीच आहे वैरीण नाही. आणि बरचं काही मन हेलावणारी व्यथा सुसाईड नोट मध्ये लिहून विधवा मातेने लेकीसह आपले आयुष्य संपविले..

हृदयद्रावक घटना, पती निधनाचा विरह

कोराेना बाधित पतीच्या मृत्यूनंतर पतीचा विरह सहन होत नव्हता, त्यात 7 वर्षीय चिमुकली पप्पांची सतत आठवण काढत होती. पप्पा जिकडे गेले तिकडे आपण जाऊ असे चिमुकलीने सांगितल्यानंतर आईने हा निर्णय घेतल्याचा उल्लेख सुसाईड नोट केला आहे.

हृदयद्रावक घटना

सुजाता प्रविण तेजाळे (३६) व अनया प्रविण तेजाळे (७, दाेघी रा. सुखसागर अपार्टमेंट, विनयनगर, नाशिक) असे या मायलेकीचे नाव आहे. शुक्रवारी (ता. १) सुजाता व अनया यांनी आत्महत्या केल्याचे मृत्यूपूर्व चिट्ठीतून समोर आले आहे. सुजाता यांनी लिहिलेली सुसाईड नाेट पाेलिसांच्या हाती लागली असून सुजाता यांचे दीर अशाेक तेजाळे हे सुजाताच्या घरी गेले असता हा प्रकार उघडकीस आला.

हेही वाचा: बापाच्या डोळ्यादेखत लेकाच्या मृत्यूतांडव; थरारक 13 तास

हेही वाचा: जलसंपदाचे कोणतेही कार्यालय मराठवाड्यात जाणार नाही- जयंत पाटील

loading image
go to top