Nashik News : "बदल घडतोय बदल दिसतोय"आमदार कांदेकडून कामांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suhas Kande, Neighbor Farhan Khan while giving the report to Chief Minister Eknath Shinde taking account of the work done in his constituency through the booklet "Bald Ghatoi Badal Dastoy".

Nashik News : "बदल घडतोय बदल दिसतोय"आमदार कांदेकडून कामांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

नांदगाव (जि. नाशिक) : विधानसभा मतदार संघातील आपल्या कामाचा लेखाजोखा आमदार सुहास कांदे यांनी "बदल घडतोय बदल दिसतोय" या पुस्तिकेद्वारे मांडला असून या कार्यवृत्ताचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

त्याची एक प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमदार सुहास कांदे यांनी नुकतीच मुंबई भेटीत सादर केला. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांना दिले. लवकरच हा प्रकाशन सोहळा होणार आहे. (Change is happening change is visible MLA Kande submitted work report to Chief Minister Nashik News)

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

आमदार झाल्यानंतर सुहास कांदे यांनी मतदार संघातील जनतेला आपण काय काम केले व किती करायचे हे अधिक पारदर्शकपणे समजण्यासाठी मतदार संघातील जनतेला आपण काय काम केले व किती करायचे हे अधिक पारदर्शकपणे समजण्यासाठी तसेच आजपर्यंतची सर्व केलेली कामे, सभागृहात उपस्थित केलेले प्रश्न, शासनाचे बडे प्रकल्प ते प्रत्येक छोट्या-मोठ्या गावातील सर्व प्रश्न आणि त्यावर त्यांनी केलेली कार्यवाही या अहवालात मांडण्यात आली आहेत.

"बदल घडतोय बदल दिसतोय" या पुस्तिकेद्वारे जनतेपुढे आणणार आहे. त्यासाठी प्रकाशन सोहळ्याचे नियोजन सुरु असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितीत राहणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात मनमाड शहरासाठीच महत्त्वपूर्ण असणाऱ्या दीर्घकालीन मागणी असणारी पिण्याच्या पाण्यासाठीची करंजवन योजना व नांदगाव-मालेगाव तालुक्यातील जनतेसाठीची सुधारित ७८ खेडी प्रादेशिक नळयोजनेच्या सर्वप्रकारच्या तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी नंतर या कामाला चालना मिळाली असून त्यानंतर प्रत्यक्षातील कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

टॅग्स :CM Eknath ShindeNashik