शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक, अधिष्ठातांच्‍या बदल्‍या

 transfer
transfer sakal

नाशिक : वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई (Medical Education and Research, Mumbai) यांच्‍या अधिनस्‍त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Subordinate Government Medical College) व रुग्‍णालयातील अधिष्ठाता (वैद्यकीय), गट-अ या पदावर तात्‍पुरत्‍या स्वरूपात पदोन्नती दिल्‍या आहेत. नियुक्‍तीच्‍या ठिकाणी अधिष्ठाता यांनी ३० दिवसांच्‍या आत रुजू व्‍हावे तसेच पदोन्नतीत स्‍वारस्‍य नसल्‍यास तत्काळ शासनास कळावे, असे आदेशात नमूद केले आहे.

विभागाने जारी केलेल्‍या परिपत्रकानुसार कोल्‍हापूर (Kolhapur) येथील शासकीय महाविद्यालयात कार्यरत डॉ.प्रदीप दीक्षित यांना महाविद्यालयातच पद्दोन्नती मिळालेली आहे. चंद्रपूर (Chandrapur) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ.अशोक नितनवरे, पुण्यातील बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ.विनायक काळे आणि नांदेड येथील डॉ.शं. च. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ.दिलीप म्‍हैसेकर यांनाही आहे त्‍याच महाविद्यालयात पदोन्नती मिळालेली आहे. तसेच डॉ.लीला गुल अभिचंदानी यांची मुंबई शासकीय महाविद्यालयाहून नागपूर (Nagpur) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बदली केली आहे. नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ.एस. एस. सोनुने यांच्‍याकडे अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्‍या अधिष्ठातापदाचा अतिरिक्‍त कारभार सोपविला आहे.

 transfer
Combined Medical Services Exam ची अधिसूचना जारी, असा करा अर्ज

अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ.कुसुमाकर घोरपडे यांची गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक पदाच्‍या रिक्‍तपदावर बदली केली आहे. सोलापूर येथील डॉ.वैशंपायन स्‍मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ.संजीव ठाकूर यांना औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बदली दिली आहे. धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ.संजय राठोड यांच्‍याकडे उस्‍मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता पदाचा अतिरिक्‍त कार्यभार सोपविला आहे.

 transfer
Medical Admission: वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची दुसरी फेरी सुरू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com