Combined Medical Services Exam ची अधिसूचना जारी, असा करा अर्ज

सीएम परीक्षा 2022 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल रोजी असणार आहे.
UPSC
UPSCesakal
Summary

सीएम परीक्षा 2022 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल रोजी असणार आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) कंबाइंड मेडिकल सर्व्हिसेस परीक्षेची (UPSC CMS Notification 2022) अधिसूचना(UPSC) जाहीर केली आहे. आयोगाने UPSC CMS Notification 2022 ही अधिसूचना upsc.gov.in अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 687 पदांची भरती केली जाणार आहे. सीएमएस परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध झाल्याने त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार upsconline.nic.in अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. सीएम परीक्षा 2022 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल रोजी असणार आहे. त्याचबरोबर ही परीक्षा 17 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार आहे.

UPSC
NTPC मध्ये भरती! 90 हजारांपर्यंत पगार;'या' तारखेपूर्वी करा अर्ज

सीएमएस परीक्षेद्वारे विविध केंद्रीय आरोग्य सेवा, रेल्वे येथे सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी, दिल्ली महानगरपालिकांमध्ये जनरल ड्युटी वैद्यकीय अधिकारी या पदांवर नियुक्तीसाठी उमेदवारांची निवड केली जाते.

कोण करू शकतं अर्ज ?-

मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या संस्थेतून MBBS ची पदवी घेतलेले उमेदवार कंबाइन्ड मेडिकल सर्व्हिसेस परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. MBBS चे जे विद्यार्थी अंतिम वर्षाला आहेत, तेही यासाठी अर्ज करू शकतात, मात्र या उमेदवारांनी विहित अंतिम तारखेच्या आधी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

UPSC
रेल्वेत भरतीसाठी नवी अधिसूचना! दोन हजारांपेक्षा जास्त पदांची भरती होणार

वयोमर्यादा-

1 ऑगस्ट 2022 रोजी उमेदवारांचे वय 32 वर्षांपेक्षा जास्त नसावे. मात्र राखीव प्रवर्गातील (एससी, एसटी, ओबीसी व इतर) उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे.

अर्ज शुल्क-

अर्ज शुल्क 200 रुपये निश्चित करण्यात आले आहे. ऑनलाइन माध्यमातून फी भरता येते. मात्र, एससी, एसटी, ओबीसी, दिव्यांग आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

UPSC
IBPS Recruitment 2022: आयबीपीएसच्या विभाग प्रमुख पदासाठी भरती, मिळणार 25 लाख पगार

UPSC CMS Application Form: या स्टेप्सद्वारे अप्लाय करा.

- सर्वात आधी UPSC च्या वेबसाईटवर upsconline.nic.in जा.

- वेबसाइटवर जाऊन ONLINE APPLICATION FOR VARIOUS EXAMINATIONS OF UPSCवर क्लिक करा.

- आता Combined Medical Services Examच्या भाग 1 रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा.

- यानंतर येथे मागितलेली माहिती जसे की, नाव, पत्ता, ईमेल, आई-वडिलांचे नाव आदी माहिती भरून नोंदणी पूर्ण करा.

- तुमचे फोटो, स्वाक्षरी आणि फोटो ओळखपत्र अपलोड करा.

- ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्ज शुल्क भरा.

- पैसे भरल्यानंतर केंद्र निवडा आणि सबमिट करा.

- अर्ज यशस्वीपणे सबमिट केल्यानंतर भविष्यासाठी तो डाऊनलोड करून प्रिंट आऊट घ्या.

- आता याच पद्धतीने पुन्हा मुख्य पानावर जाऊन पार्ट 2 साठीही नोंदणी करता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com