नाशिक : प्रभागांची तोडफोड झाल्याने 'कही खुशी कही गम'

nashik municipal elections
nashik municipal electionsesakal

इंदिरानगर (नाशिक) : महापालिका निवडणुकांसाठी मंगळवारी (ता. १) जाहीर झालेल्या प्रभागरचनेनुसार नासर्डी ते पाथर्डी परिसरात तीन नगरसेवक वाढले असून, एकूण पाच प्रभागांची निर्मिती झाली आहे. यात प्रभाग २८ ,२९, ३९ ४० आणि ४४ या प्रभागांचा समावेश आहे. नवीन प्रभागरचनेनुसार बहुतांश विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग वाचले असले तरी काहींना मात्र अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे उमेदवारीसाठी विशेषतः भाजपमध्ये कमालीची रस्सीखेच होणार आहे. (Nashik Municipal Elections)

रस्सीखेच वाढणार

लोकसंख्येनुसार प्रभाग २८ मध्ये अनुसूचित जमाती आणि प्रभाग ३९ व ४४ मध्ये अनुसूचित जातीचे आरक्षण जवळपास नक्की झाल्यात जमा आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेविका रूपाली निकुळे (प्रभाग २८) आणि नगरसेवक भगवान दोंदे (प्रभाग ४४) यांच्या अनुक्रमे जमाती आणि जाती प्रवर्गातील जागा शाबूत राहिल्या आहेत. ॲड. श्‍याम बडोदे यांचा नवा प्रभाग ४० मात्र खुला झाल्याने त्यांना शेजारी संभाव्य आरक्षण असलेल्या प्रभाग ३९ मधून कदाचित लढावे लागणार आहे.

nashik municipal elections
नाशिक महापालिकेची प्रभाग रचना जाहीर; इच्छुकांची कार्यालयात झुंबड

नगरसेविका पुष्पा आव्हाड आणि संगीता जाधव यांच्या प्रभागाचे विभाजन झाल्याने त्या त्यांचा हक्काचा चेतनानागर, राणेनगर परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग ३९ ला प्राधान्य देण्याची शक्यता आहे. याच प्रभागात राजीवनगर, कमोदनगर आदी हक्काचा भाग असल्याने सतीश सोनवणेदेखील याच प्रभागाची निवड करतील हे नक्की आहे. नगरसेवक चंद्रकांत खोडे यांचा प्रभागदेखील तुटला आहे. मात्र त्यांचा वास्तव्य असलेला इंदिरानगरचा मुख्य परिसर प्रभाग २९ मध्ये आल्याने ते येथून दावेदारी करतील, अशी शक्यता आहे. मात्र याच प्रभागात विद्यमान नगरसेविका सुप्रिया खोडे यांचा संपूर्ण वडाळागाव आणि लगतचा परिसर जोडला गेल्याने नैसर्गिकरित्या त्यादेखील दावेदार असणार आहेत. डॉ. दीपाली कुलकर्णी यादेखील विभाजनामुळे प्रभाग ३९ आणि २९ मधून आपली दावेदारी करतील, अशी चिन्हे आहेत. दुसरीकडे स्वीकृत नगरसेवक अजिंक्य साने हे फक्त प्रभाग २९ साठी जोर लावण्याची चिन्हे आहेत.

शंभर फुटी रस्त्याच्या बाजूला असणारे सावित्रीबाई फुले वसाहत, म्हाडा परिसर, श्रद्धा विहार, पांडवनगरी, मेहबूबनगर आदी परिसराचा मिळून नवीन प्रभाग ४० अस्तित्वात आला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी सर्व जागा खुल्या असण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ॲड. बडोदे हे येथून खुल्या जागेवरदेखील दावा करू शकतात.

nashik municipal elections
Nashik Municipal Election | पंचवटी, नाशिक रोडला दोन प्रभागात वाढ

प्रभाग २८ सुरक्षित

महापौर सतीश कुलकर्णी आणि शाहीन मिर्झा यांच्या डीजीपीनगर, अशोका मार्ग, शिवाजीवाडी, भारतनगर आदी भागाचा समावेश असलेला प्रभाग २८ मात्र त्यांच्यासाठी सुरक्षित झाला आहे. तर पाथर्डी, दाढेगाव, पिंपळगाव खांब, वासननगर, प्रशांतनगर, पाथर्डी फाटा आदी भागाचा समावेश असलेल्या प्रभाग ४४ मधून विद्यमान नगरसेवक दोंदे आणि सुदाम डेमसे यांचा परिसर आहे, तसाच राहिला आहे. पुढच्या टप्प्यात महिला आदी आरक्षणे जाहीर झाल्यानंतरच उमेदवारीसाठी असलेली स्पर्धा सुरू होणार आहे. तूर्तास सर्व इच्छुकांना रणनीती आखण्याची नेमकी दिशा मिळाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com