Nashik News: जॅकवेलपर्यंत पाणी आणण्यासाठी गंगापूर धरणात चर; हवामान विभागाच्या अंदाजामुळे चिंता

Gangapur Dam
Gangapur Damesakal

Nashik News: मराठवाड्याला पाणीपुरवठा करण्यासाठी जायकवाडी धरणात नाशिकच्या गंगापूर धरणातून पाणी सोडल्याने नाशिककरांवर पाणीटंचाईचे संकट कोसळणार असल्याचे निश्‍चित आहे.

त्यात हवामान विभागाकडून पुढील वर्षीदेखील पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने महापालिकेच्या चिंतेत भर पडली आहे.

त्यामुळे जूनपर्यंत धरणातील पाणी जपून वापरण्यासाठी कपातीचे नियोजन करतानाच दुसरीकडे धरणाच्या मध्य भागातील सहाशे दशलक्ष घनफूट पाणी जॅकवेलपर्यंत आणण्यासाठी चर खोदली जाणार आहे. धरणातील खडक टणक असल्याने खोदकामापूर्वी सर्वेक्षण केले जाणार आहे. (Char in Gangapur Dam to bring water up to Jack Well nashik news)

पावसाने ओढ दिल्याने मेंढीगिरी समितीच्या अहवालाचा आधार घेत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने नाशिक व नगरच्या धरणांमधून जायकवाडी धरणासाठी ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले. याविरोधात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतरही नाशिक व नगरच्या धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

१५ आक्टोबर २०२३ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीसाठी महापालिकेने गंगापूर धरण समूहातून ४४००, मुकणे धरणातून १६०० तर दारणा धरणातून १०० असे एकूण ६१०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी नोंदविली. परंतु जायकवाडीला पाणी सोडल्याने पाणी आरक्षणात कपात करत ५३०४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण देण्याची भूमिका जलसंपदा विभागाने घेतली. त्यामुळे नाशिकमध्ये पाणीकपातीचा निर्णय घेतला.

त्यात डिसेंबरपासून आठवड्यातील दर शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा प्रस्ताव आयुक्तांसमोर सादर करण्यात आला. परंतु राजकीय दबाव तसेच अवकाळी पावसामुळे वहन तुटीचे पाणी न सोडण्याची मागणी जलसंपदा विभाग तसेच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे करण्यात आल्यानंतर पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Gangapur Dam
Nashik News: शहरात ‘मिसळ-पार्ट्या’तून निवडणुकीचा माहौल; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजी-माजी नेते लागले कामाला

त्याचबरोबर जलसंपदाने महापालिकेच्या ६१०० पाणी आरक्षण मागणीवर आक्षेप घेत ५३०४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मागील वर्षी शहरासाठी ५७५० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाल्याने तेवढेच पाणी आरक्षण नाशिकसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आल्यानेदेखील पाणी कपातीचे संकट दुरावल्याचे बोलले जात आहे.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणार

पुढील वर्षाच्या एप्रिल, मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका आहे. त्यामुळे मार्चच्या मध्यावर आचारसंहिता लागू होईल. आचारसंहितेच्या कालावधीत कार्यारंभ आदेश देता येणार नाही. तातडीची बाब म्हणून निवडणूक आयोगाकडून परवानगी मागून कार्यारंभ आदेश देता येत असले तरी ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने जानेवारीतच सर्वेक्षण करून प्रस्तावाला मान्यता घेऊन ठेवली जाणार आहे.

धरणाची पाणी पातळी ५९८ मीटरपर्यंत पोचल्यास जॅकवेलपर्यंत पाणी पोचत नाही. त्यामुळे चर खोदणे आवश्यक ठरते. गंगापूर धरणातील खडक टणक स्वरूपाचा असल्याने लवकर फुटत नाही. खडक फोडण्यासाठी स्फोट घडवून आणावे लागण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम मातीच्या गंगापूर धरणावर होवू नये म्हणून सर्वेक्षण व तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन चर खोदण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

"सध्या आवश्‍यकता वाटतं नसली तरी उन्हाळ्यात पाणीपातळी खालावल्यानंतर मध्य भागातील ६०० दशलक्ष घनफूट पाणी जॅकवेलपर्यंत आणण्यासाठी चर खोदणे गरजेचे आहे. चर खोदण्यापूर्वी सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर केला जाईल." - रवींद्र धारणकर, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग.

Gangapur Dam
Nashik News: हिरावाडीतील नाट्यगृह उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत; वाहनतळाची प्रशस्त व्यवस्था

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com