esakal | मी जन्मदात्री...वैरीण नाही..म्हणणारी मृत माताच ठरली गुन्हेगार?
sakal

बोलून बातमी शोधा

mother-daughter suicide

मी जन्मदात्री...वैरीण नाही..मृत माताच ठरली गुन्हेगार?

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : 'मी जन्मदात्री आईच, पण हे जग खूप वाईट... जन्म देताना जसा त्रास झाला तसे मन घट्ट करून मी हा निर्णय घेते आहे..आणि बरचं काही मन हेलावणारी व्यथा सुसाईड नोट मध्ये लिहून विधवा मातेने लेकीसह आपले आयुष्य संपविल्याची ह्रदयद्रावक घटना (ता.२) समोर आली होती. त्यावर विविध स्तरांतून प्रतिक्रीया उमटल्या होत्या. पण आता तीच माता गुन्हेगार ठरली?

मृत माता ठरली गुन्हेगार?

कोराेना बाधित पतीच्या मृत्यूनंतर पतीचा विरह सहन होत नव्हता, त्यात 7 वर्षीय चिमुकली पप्पांची सतत आठवण काढत होती. पप्पा जिकडे गेले तिकडे आपण जाऊ असे चिमुकलीने सांगितल्यानंतर आईने हा निर्णय घेतल्याचा उल्लेख सुसाईड नोट केला आहे. कोरोनात पतीचे निधन झाल्यानंतर मुलीच्या प्रश्‍नांना उत्तर देताना हतबल झालेल्या सुजाता तेजाळे यांनी स्वत:च्या लाडक्या लेकीसह आत्महत्या केल्याच्या प्रकरणात मृत सुजाता यांच्याविरूद्ध लेकीच्या हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा: "मी जन्मदात्रीच..वैरीण नाही; मन घट्ट करून लेकीला संपविते.."

लेकीच्या हत्येचा गुन्हा दाखल

सुजाता यांनी सातवर्षीय चिमुकलीला गळफास देत स्वत: आत्महत्या केल्याची घटना विनयनगर परिसरात घडली होती. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात चिमुकलीचा खून केल्याप्रकरणी आई सुजाता प्रवीण तेजाळे (वय ३६, रा. सुखसागर अपार्टमेंट, विनयनगर) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत तपास करीत आहेत.

हेही वाचा: गडकरींना भावलं नाशिक! नाशिकमध्ये 'जे' आहे ते नागपुरलाही नाही

loading image
go to top