नाशिक- समृद्धी महामार्गाचा विस्तार होऊन यातून लवकरच आणखी एक महामार्ग नागरिकांच्या सेवेत येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नागपूर- समृद्धी महामार्गाला वाढवण बंदर जोडण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी वाढवण-इगतपुरीदरम्यान ११८ किलोमीटर लांबीच्या द्रुतगती महामार्गांतर्गत ८५ किलोमीटर लांबीचा चारोटी (ता. डहाणू, पालघर) ते इगतपुरी द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे. यासाठीची प्रक्रिया राबविण्यासाठीची सुरुवात लवकरच होईल.