esakal | सप्तशृंगगडाचा विकास आराखडा शिखर समितीच्या मान्यतेसाठी सादर : आमदार पवार
sakal

बोलून बातमी शोधा

Saptashrungigad

सप्तशृंगगडाचा विकास आराखडा शिखर समितीच्या मान्यतेसाठी सादर

sakal_logo
By
रविंद्र पगार

कळवण (जि. नाशिक) : श्रीक्षेत्र सप्तश्रृंगीदेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात पिण्याचे पाणी, सांडपाणी प्रकल्प, एल टी भूमिगत वीजवाहिनी, भक्तनिवास, निवारा शेड, रस्ते काँक्रिटीकरण व गटार यांसारख्या महत्त्वाच्या कामांचा बृहत् आराखड्यात समाविष्ट करून १९ कोटी ७२ लाखांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील असलेल्या शिखर समितीच्या मान्यतेसाठी हा आराखडा सादर करण्यात आला असल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली. (Development-plan-of-Saptashrungigad-submitted-to-summit-committee-nashik-marathi-news)

महत्त्वाची कामे प्राधान्याने व्हावी

श्रीक्षेत्र सप्तशृंगगड तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यासंदर्भात आमदार नितीन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागप्रमुख, श्री सप्तशृंगी निवासनी देवी ट्रस्ट विश्वस्त, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. आमदार पवार यांनी गडावरील सुचविलेल्या विकासकामांचा आराखड्यात समाविष्ट करण्यात आला असल्याने प्रथम टप्प्यात उपलब्ध होणाऱ्या निधीतून कोणती कामे प्राधान्याने घ्यावीत, याबाबत चर्चा करण्यात येऊन संबंधित कार्यान्वयीन यंत्रणांना सूचना देण्यात आल्या.

हेही वाचा: नाशिकच्या मेट्रो निओला वाराणसीचा अडसर

महत्त्वाच्या कामांचा आराखड्यात व खर्चाचे अंदाजपत्रक...

सप्तशृंगगड येथे बंधारा, सांडपाणी प्रकल्प, पाइपलाइन, नक्षत्र बगीचा, डोम बांधणे, ११ केव्हीए एलटी वाहिनी भूमिगत करणे, भक्तनिवास बांधणे, निवारा शेड बांधणे यांसारख्या महत्त्वाच्या कामांचा बृहत् आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. साइड गटारसहित रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी एक कोटी ५२ लाखांची अंदाजे रक्कम आराखड्यात असून, या कामांची पाहणी करून त्यानुसार अंदाजपत्रक तयार करून ते तत्काळ सादर करावे, अशी सूचना जिल्हा परिषद इवद विभागाला केली. सप्तशृंगगडावरील नक्षत्र बगीच्या कामाची अंदाजित रक्कम एक कोटी ९४ लाख रुपये असून, वन विभागाच्या अनुमतीने अंदाजपत्रक तयार करून तत्काळ सादर करावे, अशी सूचना वन विभागाचे उपवनसंरक्षक यांना केली. वणी ते सप्तशृंगगडापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर स्ट्रीट लाइट बसाविण्याच्या कामाची अंदाजित रक्कम २५ लाख रुपये आराखड्यात कामांची पाहणी करून अंदाजपत्रक तयार करून तत्काळ सादर करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वीज विभागाचे कार्यकारी अभियंता यांना आमदार नितीन पवार यांनी केली.

(Development-plan-of-Saptashrungigad-submitted-to-summit-committee-nashik-marathi-news)

हेही वाचा: येवल्यात सहा महिन्यांत फक्त ३८ हजार नागरिकांचे लसीकरण

loading image