
Nashik Sports Update : दिव्यांग खेळाडू दिलीप गावितचे यश!
पेठ (जि. नाशिक) : येथील दादासाहेब बिडकर महाविद्यालयाचा दिव्यांग खेळडू दिलीप गावित याने विद्यापीठांतर्गत झालेल्या ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम, तर ८०० मीटरमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. त्याची विभागीयआंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली.
मिनी ऑलिंपिक स्पर्धेत गावित ४०० व ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रतिनिधित्व करीत आहे. त्याच्या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा हेमलता बिडकर व सचिव मृणाल जोशी यांनी अभिनंदन केले. (disabled student Dilip Gavit success Nashik Sports Update)
हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर
हेही वाचा: Dhule News : जिल्हा रुग्णालयास कचऱ्याचा विळखा
त्यास व्हीडीके स्पोर्ट्स फाउंडेशनचे वैजनाथ काळे यांचे मार्गदर्शन लाभले. सहा वर्षापासून दिलीप सराव करीत आहे. युएसए डेझर्ट चँलेंज गेम्स, राष्ट्रीय पैरा मैदानी, युथ गेम्स, ६५ व्या राष्ट्रीय स्कूल गेम फेडरेशन, ३५ व्या राष्ट्रीय ज्यूनिअर मैदानी आदी स्पर्धांमध्ये त्याने सर्वांचे लक्ष वेधले.
हेही वाचा: Nashik News : थंडी, धुक्याने भरली हुडहुडी; द्राक्षनगरीचा पारा घसरला!