सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर पडला आहे का? - छगन भुजबळ

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbalesakal
Updated on

नाशिक : बंगळूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याची विटंबना करणाऱ्या कन्नड गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करतो. केंद्रातल्या भाजप सरकारने (BJP government) निवडणुकांच्या अगोदर 'छत्रपतींचा आशिर्वाद' असे म्हणत जाहिरातबाजी केली आता मात्र त्यांच्या सरकारला शिवाजी महाराजांचा विसर पडला आहे का..? कर्नाटकातल्या मुख्यमंत्र्यांनी यात तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे. दोषींवर तातडीने कारवाई करावी अन्यथा रोषाला सामोरे जावे लागेल. असा इशारा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिला आहे.

महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राज्याचे नाहीतर संपूर्ण भारताचे दैवत आहे. त्यामुळे त्यांच्या पुतळ्याची विटंबना महाराष्ट्र कदापिही सहन करणार नाही. कर्नाटक सरकारने बेळगाववर हक्क सांगण्यासाठी तिथे अधिवेशनाचा घाट घातलाय. मराठी जनतेवरच्या अन्यायामुळे आपण यशस्वी होऊ असा कर्नाटकचा समज असेल तर त्यांनी तो काढून टाकावा. रस्त्यावरच्या आणि न्यायालयातल्या दोन्ही लढायांत विजय मिळेपर्यंत महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही.

Chhagan Bhujbal
'त्या' समाजकंटकांना त्वरित शोधून काढा : उदयनराजे
Chhagan Bhujbal
समाजकंटकांकडून बंगळूरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sanjay Garud Arrest Latest News
Saikheda schoolgirl story
Nashik Earthquake
Maharashtra Wildlife Nashik Forest Belt Can Support Future Tiger Habitat Experts Demand Silent Corridor
Marathi News Esakal
www.esakal.com