esakal | किरीट सोमय्यांना दुसरा उद्योग नाही! हा तर शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रकार - भुजबळ
sakal

बोलून बातमी शोधा

chhagan bhujbal and kirit somayya

किरीट सोमय्यांना दुसरा उद्योग नाही! छगन भुजबळ यांचा पलटवार

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : निवडणूका (elections) तोंडावर आल्या आहेत. माझ्यावरील आरोपाबाबतचे खटले सुरु झाले आहे, अशाच काळात अचानक माझ्यावर आरोप सुरु झाले आहे. काही लोकांना दुसरे काही उद्योग नसतात असा पलटवार पालकमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी केला. किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी भुजबळांवर केलेल्या आरोपाबाबत ते म्हणाले की, अचानक पुन्हा आरोप कसे सुरु झाले आहे. निवडणूका तोंडावर आहेत. न्यायालयात खटले सुरु झाले आहे. नेमक्या अशा काळात आरोप करीत शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रकार सुरु झाला आहे. दुसरे काही उद्योग नसल्यामुळेच हे घडते आहे. जे आरोप झाले आहे ते सगळे जूनेच आहे. नव्याने करण्यात आलेल्या प्राप्तीकर विभागाच्या कारवाईचा आरोप फेटाळतांना त्यांनी अशी कुठलीही कारवाई झाली नसल्याचा दावा केला.

ओबीसी आरक्षणाबाबत एकत्र

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर राजकारण सुरु असल्याचा आरोप फेटाळला. ते म्हणाले की, भाजपसह सहित सगळे राजकिय पक्ष ओबीसीना आरक्षण मिळावे याच भूमिकेतून प्रयत्नशील आहे. त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाच्या मुद्यावर कुणी राजकारण करीत आहे असे मला वाटत नाही. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर कुणी कुणाची उणीधुणी काढायची नाही. अशीच साधारण सगळ्यांच राजकिय पक्षांची भूमिका असल्याचे माझे मत असल्याचे भुजबळ म्हणाले.

हेही वाचा: ठाकरे सरकारने रोखले शिक्षकांचे पुरस्कार - गिरीश पालवेंचा आरोप

हेही वाचा: नाशिककरांनो काळजी घ्या! रुग्णसंख्या फक्त 100 ने कमी - भुजबळ

loading image
go to top