
''देशी गाळणारेच वाईन विरोधासाठी आघाडीवर'' - छगन भुजबळ
नाशिक : वाईन म्हणजे दारु नव्हे, त्यामुळे वाईनला विरोध करण्याची गरज नाही. प्रत्येक निर्णयाला सुरुवातीला विरोध होतोच पण किराणा दुकानात वाईन विक्रीच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांत कारखान्यात दारु गाळणाऱ्यापैकीच काही जण आघाडीवर आहेत. अशी टिका पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली.
या निर्णयामागे शेतकरी अर्थकारण - पालकमंत्री
राज्य शासनाने किराणा मॉल्समध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याविरोधात टिका होत असल्याने त्याविषयी भुजबळ यांनी टिकाकारांचा समाचार घेतला. ते म्हणाले की, वाईन हे हेल्दी पेय आहे. वाईनकल्चर वाढवावे यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामागे शेतकरी अर्थकारण आणि आरोग्यदायी पेय मिळावे अशी भूमिका आहे. त्यामुळे वाईन विक्रीला विरोध करण्याची गरज नाही. कुठलाही निर्णय घेतला म्हणजे त्याला सुरुवातीला विरोध होतो. गंगापूर धऱणावर बोटक्लब सुरु करण्याच्या निर्णयावेळी असाच विरोध झाला मात्र आता बोटींग क्लबवर सगळ आलबेल सुरु आहे. वाईन बाबतीत तसेच होईल. दरम्यान याला विरोध करणाऱ्यात कारखान्यात दारु गाळणारेच आघाडीवर आहे. अशी टिका केली.
हेही वाचा: दारू हे औषध, फडणवीसांना उत्तर देताना राऊतांनी दिला साध्वींचा संदर्भ
मी हिंट दिली, शोध तुम्ही घ्या
वाईनला विरोध करणारे ते दारु गाळणारे कोण? याविषयी विचारले असता, मी हिंट दिली आहे. पत्रकारांनी शोध पत्रकारिता करावी. हिंट देण्याचे काम मी केले आहे. इन्वेस्टींगेशनचे काम तुम्ही करा. असा सावध पवित्रा घेतांना त्यांनी वाईनला विरोध करणाऱ्या विरोधकांचे नाव घेण्याचे टाळले.
ऑफलाईन परिक्षेत गैर काय?
राज्यात दहावीच्या परिक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी जोर धऱत असून ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. त्याविषयी भुजबळ म्हणाले की, जे ऑनलाईन शिकले तेच ऑफलाईन पेपरमध्ये लिहायचे आहे. त्यात चुकीचे काय आहे. ऑनलाईन अभ्यास केला असेल तर ऑफलाईन पेपरला का घाबरायचे. फक्त कागदावर तर लिहायचे आहे. असा उलटा प्रश्न केला तसेच वीज बिलाविरोधात नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. त्याबाबतही त्यांनी वीज कंपनीवर ५५ ते ६० हजार कोटीचे कर्ज असून कंपनी वाचविण्यासाठी वीज बिल भरणे गरजेचे आहे. कंपनीने ३३ टक्के सवलत दिली आहे.
हेही वाचा: वाईन पिऊन गाडी चालवल्यास दंड होणार का? मुंबई पोलिसांनी दिलं उत्तर
Web Title: Chhagan Bhujbal On The Issue Of Wine Salescriticized The Opposition
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..