esakal | नाशिकमध्ये रेमडेसिव्‍हिरचा पुन्हा काळाबाजार; पाच इंजेक्शनसह वॉर्डबॉय गजाआड

बोलून बातमी शोधा

remdesivir black market
नाशिकमध्ये रेमडेसिव्‍हिरचा पुन्हा काळाबाजार; पाच इंजेक्शनसह वॉर्डबॉय गजाआड
sakal_logo
By
योगेश मोरे

म्हसरूळ (जि. नाशिक) : गेल्याच आठवड्यात रेमडेसिव्‍हिर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या डॉक्टरला पंचवटी पोलिसांनी अटक केल्याच्या घटनेनंतर पंचवटीतील मखमलाबाद परिसरात पुन्हा एका वॉर्डबॉयला गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने ५ रेमडेसिव्‍हिरसह अटक केली.

हेही वाचा: कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण! चांदवडच्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..

या प्रकाराबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे डॉ. सुरेश देशमुख यांनी म्हसरूळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यात मयूर पितांबर सोनवणे (मखमलाबाद) या संशयितास फसवणूक, अत्यावश्यक वस्तू कायदान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्याच्याकडून पाच रेमडेसिव्‍हिर इंजेक्शन, मोबाईल व दुचाकी असा एक लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस उपायुक्त संजय बारकुंड, सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अजय शिंदे, सहाय्यक निरीक्षक अभिजित सोनवणे, उपनिरीक्षक मिथुन म्हात्रे, विजय लोंढे, हवालदार राजेंद्र घुमरे, पोलिस नाईक यादव डंबाळे, बाळासाहेब नांद्रे, गौरव गवळी, योगेश सानप, महेंद्र साळुंखे, संतोष माळोदे, प्रकाश पवार यांच्या पथकाने म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीतील मखमलाबाद गावात सापळा रचून ही कारवाई केली.

हेही वाचा: नाशिक ग्रामीणला कोरोनाचा विळखा घट्ट! दैनंदिन आकड्यात शहराला पछाडले

रुग्णांचेच डोसनंतर उरलेले इंजेक्शन

सोनवणे हा नामांकित रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून काम करतो. त्याने विनापरवाना कब्जात बाळगलेले रेमडेसिव्हिर कुठूनही विकत घेतलेले नाही. वॉर्डबॉय असताना रुग्णांनी विकत आणलेल्या इंजेक्शनपैकी डोस दिल्यानंतर शिल्लक राहिलेले इंजेक्शन संबंधित रुग्णाला परत न देता ते स्वतःजवळ ठेवले. त्यानंतर ते काळ्या बाजारात विक्री केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.