डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त भारतरत्नच नव्हे तर विश्वरत्न : भुजबळ

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbalesakal

नाशिक : जगभरातील देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी तयार केलेल्या राज्य घटनेचा अभ्यास करून त्यांच्या देशाची घटना तयार करतात. जगभरात केवळ धर्माच्या नावाने निर्माण झालेल्या राष्ट्रात कायमच उलथापालथ होत आहे. मात्र भारतासारख्या खंडप्राय देशाला एकत्रित ठेवण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेने केलेले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्नच नव्हे तर विश्वरत्न आहे. केवळ आपल्या देशावरच नाही तर त्यांचे जगावर उपकार आहेत असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.

येवला येथील मुक्तिभूमी स्मारक परिसरात प्रशिक्षण केंद्र, ग्रंथालय-वाचनालय, कर्मचारी निवासस्थान, अतिथी निवासस्थान बांधणे व इतर सुविधा पुरविणे या एकूण १५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे आज भूमिपूजन आज मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रमुख तीन टप्पे असून यामध्ये मुक्ती भूमी, दीक्षा भूमी आणि चैत्य भूमी या तीनही भूमींना विशेष असे महत्व आहे. अनेक प्रयत्नांनंतर अन्याय अत्याचार थांबत नसल्याने हिंदू म्हणून जन्माला आलो हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा केली. येवल्यातील मुक्ती भूमीवर त्यांनी धर्मांतराची ही घोषणा केली. रक्ताचा एक थेंब न सांडता देशातील ७ कोटी लोकांमध्ये धर्मपरिवर्तन घडवून आणले. जगातील ही एकमेव अशी घटना आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्श लाभल्यामुळे हे स्थान अतिमहत्वाचे तीर्थस्थळ बनलेले आहे. या भूमीवरील माती आपल्या कपाळावर लावून या भूमीचा सन्मान राखावा.

Chhagan Bhujbal
आंतरराष्ट्रीय महिला गणित ऑलिंपियाडमध्ये सानिका बोराडेला कांस्यपदक

भारतीय राज्यघटना ही सर्वोत्तम आहे. मात्र ज्यांच्या हातात सत्ता जाईल ते या घटनेचा वापर कसा करतील त्यावर तिचे श्रेष्ठत्व ठरणार आहे. एकाला एक आणि एकाला एक न्याय दिला तर लोकशाही टिकणार नाही. या राज्यघटनेला हात लावणे तर दूर याकडे वाकड बघण्याची कुणाची हिम्मत होता कामा नये. धर्माधर्मात वाद लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. द्वेष पसरविला जात आहे. लोकशाही व्यवस्थेला हे घातक असल्याचे त्यांनी सांगितले. अंधश्रद्धेचा पगडा घालण्याचा लोक काही आपमतलबी लोक करत आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांचा बळी जातो आहे. अन्यायाच्या विरुद्ध हा लढा लढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू व डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला प्रेरणा देतात त्यामुळे हेच आपले आदर्श असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्व असलेल्या गावांचा विकास करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. त्यानुसार या ऐतिहासिक स्थळाच्या विकास कामांना मंजुरी प्रदान केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री मंडळाचा शपथविधी झाल्यानंतर सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी पार पडत असतांना सर्वात प्रथम मुक्तीभूमीच्या विकासाचे हे काम मंजूर करण्यात आले. मध्यंतरी कोरोना आर्थिक निर्बंधामुळे हे काम थांबले होते. मात्र आता कोरोनानंतर पुन्हा पाठपुरावा करून या कामासाठी निधी मंजूर करून घेतला असून मुक्तीभूमी स्मारकाच्या परिसराला जोडणाऱ्या रस्त्यांचा सुध्दा विकास करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

Chhagan Bhujbal
Video : तीन हजार पुस्तके वापरत साकारली बाबासाहेबांची प्रतिकृती

यावेळी आमदार नरेंद्र दराडे, माजी खासदार समीर भुजबळ, भन्ते भारद्वाज, प्रांतअधिकारी ज्योती कावरे, तहसीलदार प्रमोद हिले, प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.बी.पाटील, उपअभियंता उमेश पाटील, बार्टीच्या व्यवस्थापक पल्लवी पगारे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, येवला बाजार समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय बनकर, भाऊसाहेब भवर, महेंद्र काले, बाळासाहेब गुंड, ए.ए.शेख, प्रकाश वाघ, मोहन शेलार, जिल्हाध्यक्ष प्रा.ज्ञानेश्वर दराडे, समाधान जेजुरकर, दिपक लोणारी, सचिन कळमकर, नाशिक मनपाच्या माजी विरोधीपक्षनेत्या कविता कर्डक, ऍड.प्रतीक कर्डक, राजेश भांडगे, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष अकबर शहा,ज्ञानेश्वर शेवाळे,मकरंद सोनवणे,संतोष खैरनार, भागीनाथ पगारे, सुभाष गांगुर्डे, सुमित चव्हाण, गोटू मांजरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com