पंतप्रधानांची सुरक्षा महत्वाचीच, पण घटनेला दोन बाजू - छगन भुजबळ | PM Modi Security Breach | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhagan Bhujbal

पंतप्रधानांची सुरक्षा महत्वाचीच, पण घटनेला दोन बाजू - छगन भुजबळ

नाशिक : प्रत्येक राज्याने पंतप्रधानांच्या सुरक्षेची काळजी घेतलीच पाहिजे. पण त्याचवेळी या मुद्याचा बाऊ करुन निवडणूकीत राजकारण पण होऊ नये, असे मत जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीव्यक्त केले आहे. पंजाब राज्यात पंतप्रधानाच्या सुरक्षेकडे राज्याकडून दुर्लक्ष झाल्याचा मुद्दा (PM Modi Security Breach) चर्चेत असून त्याविषयी भुजबळ बोलत होते.

भुजबळ म्हणाले की, पंतप्रधानाची काळजी सगळ्यांनी घेतलीच पाहिजे. पण पंजाब येथील तेथील नेमकी बाजू काय ही ऐकली पाहिजे. ऐनवेळी काही वेळा बदल झाले तर काळजी घेणे अवघड होते. काल हेलिकॉप्टर ऐवजी कारने जाण्याचे ऐनवेळी नियोजन बदलले गेले. दुसरी बाब म्हणजे पंजाबच्या शेतकऱ्यांत केंद्र शासनाविरोधातील आंदोलनामुळे रोष आहे. साडे सातशे शेतकरी गमावले आहेत. अचानक हेलिकॉप्टरचा दौरा रद्द होणे आणि शेतकऱ्यांच्या मनातील उद्रेक या दोन गोष्टीमुळे प्रकार घडला. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होते असे नाही. अशा दोन्ही बाजू असून दोन्ही बाजूने काळजी घेतली जावी.

हेही वाचा: नाशिक : गोरखपूर, नाशिकमध्ये मेट्रो निओ नारळ वाढवणार

आव्हाड यांची भावना लक्षात घ्या

ओबीसी (OBC) लढले नाही या मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याविषयी भुजबळ म्हणाले की, आव्हाड यांचे विधानापेक्षा त्यांची भावना लक्षात घेतली पाहिजे. भारतात लालूप्रसाद यादव, काशीराम असे अनेक जण लढले. दि. बा. पाटील, जि. जी. चव्हाण, जनार्दन पाटील असे अनेक जण लढले. मी पण राजीनामा दिला. जालना येथे मंडल आयोगासाठी जाहीरसभा झाली. जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं हेच होतं की, इतर समाजाप्रमाणे चवताळून बाहेर येत नाहीत, ही भावना असावी ती समजून घेतली पाहिजे. ओबीसीनी लढायला शिकले पाहिजे. ५४ टक्के ओबीसी आहे, या सगळ्या जागा अडचणीत आल्या असतील तर त्याविरोधातील आवाज तेवढाच मोठा असला पाहिजे. अशीच आव्हाड यांची भावना होती.

हेही वाचा: ट्रक आणि बसच्या भीषण अपघातात १७ ठार; राष्ट्रपतींसह PM मोदींकडून शोक

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top