..तर लस न घेणाऱ्यांना मिळणार नाही रेशन अन् पेट्रोल - छगन भुजबळ | Nashik Corona Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhagan Bhujbal

..तर लस न घेणाऱ्यांना मिळणार नाही रेशन अन् पेट्रोल - छगन भुजबळ

नाशिक : मालेगावसह काही भागात लसीकरणाचा वेग अतिशय संथ आहे. लसीकरण वाढविण्यासाठी ‘घर घर दस्तक' उपक्रम हाती घेतला जाणार आहे. मात्र त्यालाही लोकांकडून प्रतिसाद मिळणार अशासाठी औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांच्या उपक्रमाच्या धर्तीवर लस घेतली नसलेल्यांना पेट्रोल अन् रेशनसह शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार नाही. याचा विचार जिल्हा प्रशासन करीत आहे असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या कोरोना आढावा बैठकीत भुजबळ बोलत होते. विधानसभेचे प्रभारी सभापती नरहरी झिरवाळ, पोलिस आयुक्त दीपक पांडे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी आधिकारी लीना बनसोड, पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, जिल्‍हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात उपस्थित होते.

हेही वाचा: मालेगावात बंदला गालबोट; बंद दरम्यान पोलिस व दुकानांवर दगडफेक

१६ लाख फिरकलेच नाही

भुजबळ म्हणाले की, जिल्ह्याची ७० लाख ४३ हजार इतकी लोकसंख्या आहे. त्यातील ५१ लाख ७५ हजार ही १८ वर्षावरील नागरिकांची लोकसंख्या आहे. यापैकी ३५ लाख ४८ हजार ३३३ जणांनी (५० टक्के) पहिला डोस तर १३ लाख ५२ हजार ५१४ जणांनी (१९.२० टक्के) नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्यात जेमतेम पन्नास टक्केवर लसीकरण झाले आहे. मात्र मालेगावसह अनेक भागात ही टक्केवारी २७ टक्केच्या आसपास आहे. ३ लाख डोस पडून आहेत. १६ लाख नागरिक तर लसीकरणाकडे फिरकलेही नाही. लॉकडाउनच्या झळा सगळ्यांनी सोसल्या आहेत. अनेकांचे रोजगार गेले, उद्योग व्यवसाय बसले आहेत. त्यामुळे लसीकरण करुन घेणे सर्वाच्या हिताचे आहे. प्रशासन नाशिक शहर, ग्रामीण भागात घरोघर जाउन लसीकरण करणार आहे. पण जे कुणी लसीकरणाला प्रतिसाद देणार नाही. अशांना शासकीय योजनांचा लाभ न देण्याबाबत औरंगाबाद जिल्हाधिकारी यांचा निर्णयाप्रमाणे नाशिकला निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा भुजबळ यांनी दिला.

हेही वाचा: नाशिक | सुरत- चेन्नई महामार्गावर आडगाव नजीक लॉजिस्टिक पार्क

loading image
go to top